अलीकडच्या काळात मला थोडी फोटोग्राफीची आवड निर्माण झाली आहे. पूर्वी पक्षी निरीक्षण करत होत त्यालाच फोटोग्राफीची जोड मिळाल्यामुळे पक्षी निरीक्षणाचे क्षण कॅमेऱ्यात टिपले जातात आणि काही अविस्मरणीय अनुभव हाती लागतात. अशाच काही पक्ष्यांच्या फोटोंचा आणि त्याविषयी थोड्याशा माहितीचा, माझ्या काही आठवणींचा हा ब्लॉग -
१
Common Hawk Cuckoo (मराठीत पावशा) -
लहानपणापासून मला 'बोले रे पपीहरा' या गाण्यातला पपीहरा म्हणजे कोण याबद्दल कुतूहल होतं. पक्षी निरीक्षणाची आवड लागल्यावरही कितीतरी दिवसांनी कळलं की पपीहरा/पपीहा म्हणजेच या फोटोतला Common Hawk Cuckoo! साहेबाच्या भाषेत याला Brain fever bird म्हणतात हे कळल्यावर साहेब अरसिक असतात हे अगदी बरोबरच वाटू लागलं! Brain fever का तर म्हणे तो ओरडू लागला की असं वाटतं की तो Brain fever...brain fever असं म्हणतोय! आपण मराठीत मात्र त्याच्या कॉलचा अर्थ 'पेरते व्हा...पेरते व्हा' असा घेतो. उन्हाळ्यात याचा विणीचा हंगाम असतो आणि याला याच काळात कंठ फुटतो. हळूहळू वाढत जाणारा जणू crescendo pattern आणि मग शेवटी 'पेरते व्हा' अशी आवर्तनं घेत तो मादीला आकर्षित करतो.
त्याचा कॉल ऐकवणारा हा व्हिडिओ-
उन्हाने तापलेल्या वातावरणात पावसाच्या आगमनाची सुवार्ता तो देतो म्हणून याला आपल्याकडे पावशा म्हटलं जातं. हा 'पेरते व्हा' म्हणू लागल्यावर पेरणीची तयारी करायची असाही एक ठोकताळा आहे.
आम्ही मागे दांडेलीला जात असताना गाडीत पूर्ण कल्ला होता- टेपवरची गाणी, गप्पा, हसणं खिदळणं...पण यल्लापूर सोडून पुढे आल्यावर जंगल सुरु झालं आणि या गर्द हिरव्या अरण्यात त्याचा आवाज ऐकला आणि आम्ही एकदम भारावूनच गेलो ! संपूर्ण जंगलभर पावश्याचा आवाज भरून राहिला होता. तेव्हा आम्ही गाणी, टेपरेकॉर्डर वगैरे सगळं बंद करून तो आवाज कानामनात साठवत होतो. तो आवाज अजूनही कानात घुमतोय! हा फोटो मात्र आमच्या पुण्यातल्या तळजाई टेकडीवरचा आहे.
परवा तर हा चक्क आमच्या सोसायटीतही आला होता आणि तो टिपिकल ओरडूही लागला होता. पण दिसला मात्र नाही. पण त्याची पावसाची सुवार्ता मात्र खरी ठरली!
( बोले रे पपीहरा या सुप्रसिद्ध गाण्याची लिंक इथे देत आहे- https://www.youtube.com/watch?v=56AUdC9mn4E )
या पावश्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक सुरेख कविता आहे. तीही वाचण्यासारखी आहे-
पेर्ते व्हा -
पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड!
पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी
-बहिणाबाई चौधरी
२
आपण एखाद्या आवडत्या गायकाच्या कार्यक्रमाला जातो. त्या कार्यक्रमाचा पूर्वार्ध अतिशय रंगतो. आपण तृप्त झालेलो असतो पण आपल्याला आणखीही ऐकायची इच्छा असते. तेवढ्यात हुरहूर लावणारं मध्यांतर होतं . इतकंच नाही तर ते लांबतं आणि त्यानंतर मात्र एक वेगळाच गायक येतो आणि आपली कला सादर करू लागतो. आपला खरं तर हिरमोड होतो. पण नंतर आपल्या लक्षात येतं की खरं तर हा पण चांगलंच गातोय की!
असाच काहीसा अनुभव या Tickell's Blue Flycatcher च्या बाबतीत आम्हांला आला. आम्ही फोटो काढायला कॅमेरे घेऊन भर पावसात बसलो होतो ते तिबोटी खंड्या(Oriental Dwarf Kingfisher) साठी! पण तो बराच वेळ झाला तरी येतच नव्हता. आणि त्याच रंगमंचावर हा flycatcher आपली कला सादर करू लागला! तेही त्याच्या तोंडातल्या kill सह! फोटोग्राफीचं स्किल पक्कं करण्यासाठी आपणहून चालून आलेली ही संधी कोण सोडेल!?
3
Oriental Magpie Robin ( दयाळ)
Everything, as they say, in Life is not Black or White but in shades of grey. But when you do find something that is stunningly black & white, you have to appreciate it. This bird has right combination of these colours. It's essentially a backyard bird, a passerine ( its claws are so structured that it can perch on a branch of a tree). It is very gregarious and busy bird. It's whistle is so endearing that you can't prevent yourself from imitating it. If the bird is in a mood, it may oblige you and respond to your whistle and you can engage yourslef in a dual - an exchange pleasantries on whistle!
Incidentally, this bird is a national bird of Bangladesh and it's currency has image of this bird. There is also a square- Doel( दयाळ) Chattar there...
मस्त.... फोटो पण छान आणि वर्णन पण आपण त्यांना प्रत्यक्ष बघत असल्यासारखे!
ReplyDelete