( ओ पी नय्यर यांचा १६ जानेवारी हा जन्मदिवस ! त्यानिमित्त हे लिखाण !)
ओ पी नय्यर यांच्या विषयी मागच्या एका ब्लॉगमध्ये मी त्यांच्या गाण्यांच्या मुखड्यात शब्दांच्या पुनरावृत्तीबद्दल लिहिलं होतं. इंग्रजी भाषेत अशा प्रकाराला Anaphora असं म्हणतात.
(उदा- दिल पर हुआ ऐसा जादू तबियत मचल मचल गई
नजरे मिली क्या किसीसे के हालत बदल बदल गई )
अशा प्रकारची २० तरी गाणी मला माहीत आहेत.(आणखीही असू शकतील) तसंच त्यांच्या गाण्यांचं आणखी एक वैशिष्टय मला जाणवलं. त्यावरच आताचं हे लिखाण !
ओ पी नय्यरांनी संगीतबद्ध केलेल्या पुढील गाण्यात कुठे ना कुठे एखाद्या शहराचं, प्रांताचं किंवा देशाचं नाव येतं. एकाच संगीतकाराची अशा प्रकारची इतकी गाणी निदान माझ्या माहितीत तरी नाहीत. तर आता आपण त्यांच्या गाण्यांतून या शहरांच्या सफरीला सुरुवात करूया !
१) आधी भारताच्या उत्तर भागात जाऊ. नय्यरांच्या एका चित्रपटाच्या नावातच एक प्रांत आहे- 'काश्मीर की कली' !त्यातल्या गाण्यांत कुठल्या प्रांत किंवा शहराचा उल्लेख नव्हता. पण १९६८ सालच्या 'किस्मत' या चित्रपटातल्या 'कजरा मुहब्बतवाला अखियों में ऐसा डाला' या गाण्याच्या पहिल्या कडव्यात दोन शहरांची नावं आहेत-
आई हो कहाँ से गोरी आँखों में प्यार ले के
चढ़ती जवानी की ये पहली बहार ले के
दिल्ली शहर का सारा मीना बाज़ार ले के
झुमका बरेली वाला, कानों में ऐसा डाला
झुमके ने ले ली मेरी जान
https://youtu.be/45N5EY-iy7g
१९७४ सालच्या 'प्राण जाये पर वचन न जाये' या सुनील दत्त- रेखा अभिनित चित्रपटात एक गाणं आहे. यात तब्बल ६ शहरांची नावं आहेत. मुखड्यातच पाहा-
बिकानेर की चुनरी ओढी लेहंगा पहना जयपूर का
हाथ में चुडी फैझाबादी और मेरठ का गजरा
ओ कजरा डालके तेरे दिल पे मैं नाचू
तर पहिल्या कडव्यात-
चोली मेरी अंबाले वाली
झिलमिल जिसमे रेशम की जाली
जाली से तन चमके चमकेगा
मुखडा मेरा दमके दमकेगा
खास बरेली वाला दोनो आँखों में कजरा
ओ कजरा डालके....
(दुर्दैवाने या गाण्याचा व्हिडिओ उपलब्ध नाही)
२) आता आपण उत्तरेकडून पूर्वेकडे येऊया ! १९५६ साली 'ढाके की मलमल'(किशोरकुमार -मधुबाला) हा चित्रपट आला होता. याला संगीत ओ पी नय्यरांचं होतं. तसंच १९५८ साली 'हावडा ब्रिज' (अशोककुमार-मधुबाला) या कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध पुलाचा संदर्भ असलेल्या चित्रपटालाही त्यांचं संगीत होतं. त्या चित्रपटाकडे आपण थोडं नंतर येऊ.
१९६६ साली आलेल्या -'बहारे फिर भी आयेंगी' या चित्रपटात जॉनी वॉकर वर चित्रित एक गाणं होतं.
त्यातले शब्द-
सुनो सुनो मिस चॅटर्जी
मेरे दिल का मॅटरजी
कलकत्ते वाली रूठ गई क्यो
बात नहीं ये बेटर जी ....
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwj4tqOY87bRAhXMro8KHeDODokQtwIIGzAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DlauAr3hjKpY&usg=AFQjCNG7Bh1M57_JXK6oa-KUnxfGqyrc0Q&sig2=1fQJAn2yVWR3zfXt1wpvtQ
३) पूर्वेकडून आपला प्रवास आता आपण दक्षिण दिशेला करूया! १९५८ सालच्या 'रागिणी' (अशोककुमार, किशोरकुमार, पद्मिनी) या चित्रपटात एक गाणं होतं. त्याचे शब्द होते-
मैं बांगाली छोकरा करू प्यार को नमस्कारम
मैं मद्रासी छोकरी मुझे तुमसे प्यारम
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwj0tejS9LbRAhUlTY8KHQUhDZQQtwIIGzAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3D8x2MqmcymRg&usg=AFQjCNHIE5fFIWGP6Ir5sixFrq-f2yPtmA&sig2=b9ZAfG9s_8pAYsvxMQWEQQ
४) दक्षिणेनंतर आता आपण आलो आहोत पश्चिमेकडे ! १९५६ सालच्या ' CID '(देव आनंद, शकीला, जॉनी वॉकर, वहिदा रहमान, कुमकुम) चित्रपटातलं मुंबई शहरावर आधारित गाणं कोण विसरेल? मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे अजरामर गाणं आजही तितकंच relevant आहे.
ए दिल है मुश्किल जीना यहां
जरा हटके जरा बचके
ये है बॉम्बे मेरी जान
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=2&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwi0n-XE_7bRAhUMro8KHepxBpQQtwIIHjAB&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3D7Xu44aq8Fog&usg=AFQjCNGF9AvR9SJHNBY5YumoYbqEeoAs5Q&sig2=qasr4JqJIHAfD_1JCs2FYA
५) जसं वरच्या गाण्यातून मुंबई शहराची, तिथल्या लोकांच्या वृत्ती-प्रवृत्ती विषयी वर्णन केलंय, तसंच आपल्या देशाचं वर्णन 'नया दौर' या १९५७च्या चित्रपटातील एका गाण्यात आहे. देशाच्या चारही कोपऱ्यातून आपण केलेल्या प्रवासानंतर हे गाणं औचित्यपूर्णच, नाही का?( तांत्रिकदृष्ट्या या गाण्यात आपल्या देशाच्या नावाचा उल्लेख होत नाही)
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwj3rryqg7fRAhVJOY8KHU-mAQ4QtwIIGzAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DEWnPJY_o7tw&usg=AFQjCNGGDj9Hi-kpdYriVKjuIYR30Qto8g&sig2=j8EWjgNHWcSFU22JY5KXfw
आतापर्यंत ओ पी नय्यर यांच्या गाण्यांतून आपण देशांतर्गत प्रवास केला. आता आपण परदेश पर्यटनही करू या !
६) मगाशी 'हावडा ब्रिज' चित्रपटाबद्दल बोललो होतो. त्यातलं सर्वांच्या माहितीचं हेलन वर चित्रित केलेलं गाणं- 'मेरा नाम चिन-चिन-चू' ! याच्या पहिल्या कडव्यात-
बाबूजी मैं चीन से आई, चीनी जैसा दिल लाई
सिंगापूर का यौवन मेरा, शंघाई की अँगड़ाई
दिल पर रख ले हाथ ज़रा, हो जाए ना पागल तू
मेरा नाम चिन-चिन-चू...
-चीन आणि सिंगापूर या देशांचा तसंच चीनमधल्या शांघाय या शहराचा उल्लेख येतो.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjHq8bgh7fRAhWMOY8KHYdeADgQtwIIGzAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DlVKEMOenP-o&usg=AFQjCNEbjdSpVGScntJ0vaBgE7afVE9DxQ&sig2=vmgCbdmexCY_6SC_QpcQVA
१९६२ साली 'हाँगकाँग' (अशोककुमार, बी. सरोजादेवी) या चित्रपटांत ३ गाण्यांमध्ये मिळून तब्बल ५ देशांची नावं आणि २ शहरं येतात. गंमत म्हणजे ही तीनही गाणी लिहिणारे गीतकार आहेत-गझलसम्राट राजा मेहदी अली खान!
पहिलं गाणं -हाँगकाँग,चीना मीना सिंगापूर
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwimuv6uibfRAhWMMY8KHaqsAE4QtwIINTAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DKu59XpjUdmw&usg=AFQjCNGMc-VP5TZ2A9LqH8xkie0KTiVwTg&sig2=3eKXqACnhuoNAQEg_Qz9fg
दुसरं गाणं -
केनिया, युगांडा, टांगानिका -

आणि तिसरं गाणं-
होनोलुलु
जाने जिगर
आज तुने हंसके देखा
खो गई होऊन मैं !
होनोलुलु
जाने जिगर
आज तुने हंसके देखा
खो गई होऊन मैं !
(याही गाण्याचा व्हिडिओ उपलब्ध नाही )
एकाच संगीतकाराची एवढी सगळी शहर/प्रांतांवर आधारित गाणी कशी या प्रश्नाचं समर्पक उत्तर माझ्याकडे नाही. केवळ एक गमतीशीर योगायोग म्हणून याकडे बघावं का? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा....

काय अनवट दृष्टिकोन! तुम्ही किती अंगांनी संगीताचा व संगीतकाराचा वेध घेता त्याची एक चुणूक
ReplyDelete