Wednesday, 15 January 2014

ओ पी : तुमसा नही देखा !


(१६ जानेवारी -ओ पी नय्यर यांच्या जन्मदिनानिमित्त )


एखाद्या संगीतकाराचं वैशिष्टय त्याच्या चाल बांधणीतून कळतं. . ऑर्केस्ट्रा काय वापरलाय त्यावरून कळतं . . . रिदम वरून कळतं . . . एखाद्या विशिष्ठ वाद्याच्या वारंवार वापरावरून कळतं. . . . हे सगळं ओ. पी. नय्यर यांनाही लागू आहेच. पण त्यांचं आणखी एक वैशिष्टय मला जाणवतं. .  ते म्हणजे त्यांच्या गाण्यात ध्रुवपदात एकच शब्द पुन्हा पुन्हा येतो. इंग्रजी व्याकरणात याला Anaphora असं म्हणतात. हिंदी मध्ये याला काही वेगळे नाव आहे का माहित नाही. पण अशा पुनरावृत्तीमुळे गाणं उठावदार होतं, त्याच्या सौंदर्यात भरच पडते. माझ्या माहितीत ओपी ची २० गाणी आहेत ज्यामध्ये हे दिसून येतं. आणखीही असतील.  या यादीत भर पडली तर आनंदच वाटेल-


१) ए लो मैं हारी पिया हुई तेरी जीत रे 
काहे का झगडा बालम नई नई प्रीत रे - आरपार 
२) सुन सुन सुन जालिमा - आरपार 
३) अरे ना ना ना तोबा तोबा- आरपार 
४) कभी आर कभी पार लागा तीरे नजर-आरपार 
५) पूछ मेरा क्या नाम रे 
नदी किनारे गाव रे 
पीपल झूमे मोरे अंगना 
ठंडी ठंडी छांव रे - सी. आय. डी 
६) लेके पहला पहला प्यार- सी. आय. डी 
७) आंखो ही आंखो में इशारा हो गया-सी. आय. डी 
८) मेरा नाम चिं चिं चू बाबा चिं चिं चू - हावडा ब्रीज 
९) देखो कसम से कसम से कहते ही तुमसे हां- तुमसा नाही देखा 
१०) जाने कहा मेरा जिगर गया जी 
    अभी अभी यही था किधर गया जी- Mr & Mrs. ५५
११) दिल पर हुआ ऐसा जादू 
तबियत मचल मचल गयी 
नजरे मिली क्या किसीसे 
के हालत बदल बदल गयी- Mr & Mrs. ५५
१२) उडे जब जब जुल्फे तेरी- नया दौर 
१३) पिया पिया पिया मोरा  जिया पुकारे- बाप रे बाप  https://www.youtube.com/watch?v=zjObtEbqwUM
१४) हाय रे हाय ये मेरे हाथ में तेरा हाथ 
नये जजबात मेरी जान बल्ले बल्ले - कश्मीर की कली 
१५) इशारो इशारो में दिल लेनेवाले- कश्मीर की कली 
१६) पुकारता चला  हू मैं 
 गली गली बहार की- मेरे सनम 
१७) जाईये आप कहा जायेंगे 
ये नजर लूट के फिर आयेगी 
दूर तक आप के पीछे पीछे- मेरे सनम 
१८) होले होले साजना धीरे धीरे बालमा https://www.youtube.com/watch?v=HY2vDhWOhRI
जरा  होले होले चलो मेरे साजना -सावन की  घटा 
१९) रातोंको चोरी चोरी बोले मोरा कंगना -मोहब्बत जिंदगी है 
२०) चल अकेला चल अकेला चल अकेला - संबंध 

एवढ्या संख्येने अशा प्रकारची गाणी का आली असावीत? माझ्या मते-
१) आपण बोलताना सहज असे शब्द वापरात असतो- पुन्हा-पुन्हा, जाता-जाता, असेच शब्द गाण्यात आले की ते गाणे आपलेसे वाटते. 
२) एखादी गोष्ट ठळकपणे मांडायला शब्दांच्या द्विरुक्तीचा उपयोग होत असावा- उदा - चल अकेला हे एकदा म्हटल्याने तितकेसे emphasize होत नाही. पण हेच ३ वेळा आले की ते एकट्याने पुढे जाणे अधोरेखित होते. 
३) काही वेळा असे होत असावे की गाण्याची चाल आधी बांधली जात असावी आणि मग त्या मीटर मध्ये चपखल बसण्यासाठी अशा शब्दांची मदत घ्यावी लागत असावी. 
४) आधी म्हटल्याप्रमाणे याने गाण्याचे सौंदर्य आणखी वाढते. प्रेम, नटखटपणा, रुसणे-मनवणे याची वेगवेगळी रूपे या द्विरुक्तीतून दिसतात.