Thursday 25 May 2017

The Story of Tigress & cubs of Bandhavgarh-1

The story of Kankati-
As mentioned in my earlier blog, we saw Bamera's Son & 3 cubs at a place called Tadoba in the Maghadi zone of Bandhavgarh. The cubs were 4 months old & needed attention from their mother. But it was a surprise that even the father Bamera's Son was taking that responsibility. We didn't see the Mother in the evening safari on the first day. But next day in the same place, we saw her( this time there was no father- or Bamera's Son) along with the cubs & a small story unfolded in front of us. Well, we couldn't capture the story entirely in our cameras. So I would have to fill in those gaps with my words..

It so happened that Kankati had a kill & she was feasting on it along with her 4 month old cubs when we saw them in the morning. The jury is still out whether the kill was a wild boar or a spotted deer! 
The tigress Kankati





For the cubs it was a learning session- they watched their mother eating the kill, intently & observantly.


One of the cubs, tried to snatch a piece away from the mother & received a loud 'scolding' from mother & so had to retreat..




Kankati enjoying the brunch...


The no-non sense looks...

Its interesting why they named her 'Kankati'. In this photo, you could see the slight slit on her left ear...


After she was finished with eating her share, the kids took their turn & then...

... It was time to clean..

In the meanwhile, there was one independent-minded cub.. It went on its own, away from the mother to the pond nearby.


It took dip in the water...

...came out..

..to return to the family...

This girl, Kankati, was so cool that she posed for the photographers... She was in the world of her own.. Oblivious to the surrounding..not distracted by the human presence ,the noise of the constant gunfire like clicking that could be heard, & also the attention,that she & her family were getting..

Having had a sumptuous meal could also be the reason for her poses...

A cuddly cub & a motherly care..

After the brunch... it was about time to venture out...Baby's Day out with Mommy...

Time to cool off & for a morning siesta...all at once...
... And for the kids to just relax & hang around..

A Family that eats together, stays together !!!
 

(Photos by my daughter Smruti Pusalkar)


Tuesday 23 May 2017

Tigers of Bandhavgarh...

Bandhavgarh National Park is situated in central Indian state of Madhya Pradesh- in the Umaria district. It is spread over approximately 1700 square km( as told to us by the guide during our trip.) & 4 zones- Khitauli, Tala, Maghadi & Panpatha. We are allowed to see only the 20% of the jungle. It has one of the highest density of tiger population in India.The park is open from 16 October till 30th June. But I would say that the best time to visit for higher probability of tiger sighting is in April & May-even if the temperature could rise up to 42 degree C. But it is at this time that the water becomes scarce, the vegetation is dry & the tigers have to come near the waterholes. Therefore it becomes easier to see them out in the open. The nearest airport is Jabalpur (about 200 km away from Bandhavgarh) & the nearest railway station is Katni (about 100 km).The roads from Jabalpur & katni are in good shape. So the travel to Bandhavgarh is  hassle free taking 4 hours from Jabalpur & 2 hours from Katni to reach to the national park.











We went to Bandhavgarh from 11-13th may 2017 & saw 12 tigers over there-3 adult males       (Bheem, Bamera's son & Mahamana's son) 3 females (Spotty, Kankati & Solo) & 6 cubs- 3 of Spotty & 3 of Kankati. We saw tigers in each of the 5 safaris. If we count the repeat sightings, then in our total trip we saw 21 tigers! 

Before this trip to Bandhavgarh, my count of tiger sighting was-
1) Kanha (2008)-1
2) Jim Corbett (2011)-0
3) Tadoba 
(2016)- 4

Of course, even if I might not have seen many tigers, I have thoroughly enjoyed all my trips to the jungle. Each trip has been etched on my mind for different reasons- I think that the Kanha jungle is extremely well maintained. I remember the meadows,the exclusive Barasinghas, the different birds(especially the spotted owlets & scarlet minivets, the Painted Francolin)) & also the tall Saal trees. We saw tiger only once over there, but it was thrilling to experience the presence of a moving tiger near you through the alarm calls of spotted deer, barking deer, the vigorous tapping of feet made by the Sambar deer & also the restless activity of the langurs- all this in the silence of the jungle! Jim Corbett National Park had an entirely different terrain & beauty of its own. The vast expanse of the jungle was indeed v haunting. During the evening safari we had seen at least 150 elephants gathering near a lake as if it were a World Elephant Conference! The river Ramganga that flows right through the jungle, has a tendency to change its course.That alters the jungle significantly. I would remember Tadoba for the ease with which we could see a pack of Wild dogs from a close distance at Pandharpauni. 

To see 21 tigers in 5 safaris at Bandhavgarh was indeed very rewarding to say the least! Another aspect was that we could see them for a pretty long period of time & from a v close distance. It wasn't just a fleeting sight. We could see them for at least 1/2 hour or more..In fact we had to leave their place & go somewhere as either it was the end of safari or we wanted to see other part of the jungle. . So we can safely conclude that Bandhavgarh doesn't disappoint...

Here, in this album, is a look at the 3 adult males that we saw during our trip & these are by no means the only tigers in Bandhavgarh!

1) This is Mahamana's Son- seen in the Maghadi zone-

Earlier I had mentioned about dry vegetation in summer. One can appreciate in this photo how that has helped us to spot the tiger. If the grass were to be green & tall(which is the case in winter), we would not have been able to see the animal. It is also interesting how these animals get their names. Mahamana is actually the name of the village nearby. A tigress was seen in that area. So she began to be named as Mahamana tigress & this is her son. So sometimes, the tigers get their names from the areas they are seen. Sometimes they are named due to their peculiar characteristics on their body- for example Spotty & Dotty-the two sisters got their names from their spots. While Kankati, the tigress got her names due to a slit on her left ear.And then initially there was a tiger by the name Charger- who was so named as he used to charge on to vehicles & elephants.
This guy, Mahamana's Son  was not far from us & was hidden in the grassland. It was evening time & just about time to wind up the safari. We had already seen Bamera's Son with 3 cubs.So we were in that sense very much contented.  But there were still some people from other jeeps who were audacious enough to go almost away from the road in to the grass to have a closer look at the animal... That was totally unnecessary & full of risk. Thankfully, he didn't react...


2) Bheem- Seen in the Khitauli Zone. We saw this royal, majestic animal, perhaps the biggest tiger of Bandhavgarh during the very first safari. And let me also tell you that it was a very close encounter for us. He was walking alongside our vehicle & was only 6-8 feet away from us. But he was calm & composed. He was in the world of his own & went away crossing our vehicles.


Bheem cooling himself in water in the scorching summer heat...

... and then walking away...

3) Bamera's son- Seen in the Maghadi zone. 

An unusual trait for this guy is that he is still with his approximately 4 month old cubs. This also means that he shares the responsibility of making a kill for the cubs, along with the mother of the cubs-Kankati. The guides told us that this was similar to his father- Bamera.


Bamera's son again- It is interesting to note that whenever tigers have to enter water, they do so by putting their hind limbs first in the water. May be this way, they are able to judge the depth of the water..
 



Interestingly this area is called Social or Tadoba. I don't why is it called Social. But the pond seems to be artificially made for the tigers. And there are similar waterholes in Tadoba. So the name... So we actually saw a Tadoba in Bandhavgarh!

Wednesday 17 May 2017

बांधवगढचा 'भीम' !


                                                                     
                                                                              १

आम्ही बांधवगढला जाणार म्हटल्यावर काही जणांच्या भुवया उंचावल्या-'इतक्या उन्हाळ्यात? एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जा ना..' इथपासून ते 'बांधवगढमध्ये वाघ वगैरे काही दिसत नाहीत. कशाला जाताय?त्यापेक्षा रणथंबोर बरं!' पर्यंत अनेक अनाहूत सल्लेही मिळाले. अर्थात आमचं सगळं बुकिंग झालेलं होतं. त्यामुळे आमचा निर्णय बदलणार नव्हताच ! जंगलांमध्ये जाऊन फक्त वाघ बघणे ही एक गोष्ट आहे (आणि त्यात गैर काहीच नाही !) पण सगळं जंगल अनुभवणं- तिथले इतर प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज, त्या आवाजांची वैशिष्ट्यं समजणं, एवढंच नाही तर तिथली झाडं,फळं, पानं-फुलं बघणं, जंगलांत येणारा मातीचा, पानांचा वेगळा वास घेणं, होता होईल तेवढं जंगल वाचणं- हे ही आम्ही आमच्या परीनं करत आलोय आणि ते आम्हांला खूप आवडतं. या सगळ्याच्या जोडीला मित्रपरिवाराची साथसंगत असेल तर हा आनंद आणखी द्विगुणित होतो हे ही आम्ही अनुभवलं होतं. त्यामुळे वाघ दिसणं न दिसणं हे काही जीवनमरणाच्या प्रश्नाइतकं महत्त्वाचं नव्हतं. असं म्हणतात की तुमच्या अपेक्षा माफक असतील तर तुम्हांला अपेक्षाभंगाचं दु:ख कमी होतं आणि जर अपेक्षांपेक्षा खूप काही मिळालं तर त्याचा आनंदही जास्त होतो. त्यामुळे आम्ही कमीत कमी अपेक्षा ठेऊन बांधवगढला निघालो.

                                                                                 २
आमची ट्रिप अरेंज करून देणारे श्री नितीन पवार यांनी आमची पहिली सफारी बांधवगढच्या खितौली गेटची दिली होती. त्याचबरोबर त्यांनी हे ही सांगितलं होतं- खितौलीला अलिकडे वाघ कमी दिसतायत. पण तुम्ही जंगलाचा आनंद घ्या. तुम्हांला ते नक्की आवडेल. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो, तिथल्या मॅनेजरने तर आणखी एक नकारात्मक गोष्ट सांगितली- खितौलीच्या जंगलात नुकताच वणवा पेटला होता. त्यामुळे तिथून सगळे प्राणी दुसरीकडे गेले आहेत असं ते म्हणाले. ते ही म्हणाले -'You just enjoy the jungle!' हे अर्थातच आमची थोडीशी (अगोदरच) समजूत काढल्यासारखं झालं. सफारीला आमच्याबरोबर माझा शाळेतला मित्र श्रीधर अय्यर, त्याची बायको आणि मुलगी असणार होते. तो मात्र अतिशय उत्साही होता. त्याची मुलगी श्रीयाही जंगलात जायला उत्सुक होती. त्यामुळे निघताना आम्ही छान मूडमध्ये निघालो.

                                                                                  ३
सफारीची वेळ संध्याकाळी ४ ते ७ अशी होती आणि बरोबर ४ वाजता तिथल्या वन खात्याच्या लोकांनी गेट उघडलं. आत शिरल्यावर लगेचच वेगवेगळे पक्षी दिसू लागले..
Greater racket tailed drongo
















Asian paradise flycatcher (स्वर्गीय नर्तक)-












(फोटो- सौजन्य इंटरनेट) 


Golden Oriole (हळद्या)














(फोटो- सौजन्य इंटरनेट) 

एवढंच नाही तर एका झाडावर चढून बसलेला Lesser Adjutant stork (लहान क्षत्र बलाक) ही दिसला. 














तसंच उडताना सुंदर निळे पंख दाखवणारा Indian Roller(नीलपंख) ही दिसला.

Common Hawk Cuckoo(पावशा) पक्षीही अगदी जवळून दिसला-

Magpie Robin( दयाळ) पक्ष्याची मंजूळ शीळ, Greater racket tailed drongo चे वेगवेगळे आवाज, Rufous Tree pie(टकाचोर) चा कॉल, Plum headed Parakeet (पंचरंगी पोपट) चं सुंदर दर्शन आणि कॉल! कुठे बघू, काय बघू आणि किती बघू, काय काय ऐकू  असं होऊ लागलं. या शिवाय जंगलात नेहमी दिसणारे प्राणी होतेच- सांबर, चितळ (spotted deer), लंगूर इ . हे असं एकटं रानडुक्कर (Wild boar)ही दिसलं-
 


एकंदरीत सुरुवात तर छान झाली होती. साल, तेंदू, मोहाची झाडं, बऱ्याच झाडांना आलेली नवी पालवी, अध्येमध्ये दिसणारी पाणवठ्याची ठिकाणं आणि त्याभोवती अर्जुन, जांभळाची झाडं असं हिरवंगार जंगल होतं. 


                                                                                          ४ 
आमच्या सर्वसाधारण सफारींचा अनुभव असा आहे की गाडीचा ड्रायव्हर आणि गाईड दोघेही उत्साहाने माहिती देत असतात. खितौलीच्या सफारीला आमच्याबरोबर ड्रायव्हर होते यादव आणि गाईड होते पांडेजी! विशेषतः पांडेजी आमच्या (माझ्यापासून ते लहानात लहान श्रीया पर्यंत) सगळ्यांच्या प्रश्नांना न कंटाळता, न चिडता, प्रत्येकवेळी तेवढयाच अदबीनं उत्तरं देत होते. चालत्या गाडीला मध्येच थांबवून आम्हांला त्यांनी झाडावर वाघाने केलेल्या नखांची निशाणी दाखवली-

आमच्याशी बोलत असताना त्यांचं लक्ष जमिनीकडे होतं आणि कान कुठून चितळच्या alarm calls कडे होतं. आणि अचानक त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं. जमिनीवरील रेतीत आदल्या दिवशी झालेल्या पावसाच्या हलक्या शिडकाव्यामुळे ओलसरपणा दिसत होता आणि त्यावर त्यांना वाघाच्या पंज्याचं निशाण दिसलं. निशाण ताजं होतं आणि मोठं होतं. त्यावरून त्यांनी ते नर वाघाचं असल्याचं ओळखलं-
 

म्हणजेच इथून पुढे नुकताच वाघ गेला असण्याची शक्यता होती. त्या निशाणाचा पाठलाग करत आम्ही पुढे जाऊ लागलो. 

                                                                                       ५
आता सगळ्यांचा उत्साह आणखी वाढला. उत्कंठा वाढली. म्हणजे आपल्याला वाघ दिसणार तर!पाठलाग करताना असं दिसलं की (कदाचित) आमच्या आधी गेलेल्या गाडीच्या चाकाच्या निशाणावर वाघाच्या पंज्याचं निशाण होतं. शिवाय एका विशिष्ट ठिकाणानंतर पंज्याचं निशाण दिसेनासं झालं. पांडेजींनी अंदाज बांधला की जिथून निशाण दिसेनासं झालं होतं तिथून वाघ वळला असणार. आमच्या डावीकडे एक छोटीशी टेकडी होती आणि तिच्या पलीकडे एक पाणवठा होता. वाघ शॉर्टकटने तिथे गेला असेल असं पांडेजींना वाटलं. मग आम्ही मार्ग बदलून त्या पाणवठ्यापाशी गेलो. तिथे एक दोन जीप आधीच थांबलेल्या होत्या. समोरासमोरच्या दोन बाजूंना टेकड्या आणि मध्ये पाण्याचा झरा असं तिथलं 'नेपथ्य' होतं. समोरच्या टेकडीवरून चितळाचा alarm call येत होता असं दुसऱ्या गाडीतले गाईड सांगत होते. त्यावरून तिथे बिबट्या असण्याची शक्यता त्यांना वाटत होती. संध्याकाळची वेळ...थोडंसं मळभ... तशी दाट झाडी... त्यामुळे तिथे थोडा अंधार होता... वाघ किंवा बिबट्या कोणीतरी तिथे येणार हे नक्की होतं. म्हणून आम्ही तिथे थांबून राहिलो. एक अस्वस्थ, उत्कंठावर्धक शांतता!

                                                                                        ६ 

ही शांतता भंग झाली कारण आमच्या डावीकडे साधारण ३०-४० फूटांवर आम्हांला दिसला एक भला मोठा वाघ !

तो आमच्या समोर हळू हळू येऊ लागला-

त्याने आमची दखल घेतली. पण ते तेवढ्यापुरतंच!तो त्याच्या त्याच्या जगात धुंद होता. साहेब चालत चालत पाण्याकडे पोचले. आम्ही त्याच्या देखण्या रुपाकडे बघत राहिलो. तो चक्क पाण्यात बसला. हाच होता बांधवगढचा सगळ्यांत मोठा वाघ -भीम !
 

थोडावेळ पाण्यात बसून, जांभया देऊन झाल्यावर साहेब उठले आणि आमच्या उजवीकडच्या दिशेने चालू लागले. 
आम्ही त्याच्यापासून २०-३० फुटांवर होतो. पण या फोटोत तुम्ही बघा- आम्हांला त्याने अनुल्लेखाने पूर्णपणे मारले होते! Royal ignore म्हणतात ते हेच ! सगळ्या गोष्टी इतक्या अफाट आणि इतक्या पटपट घडत होत्या की कॅमेरा, त्याचे सेटिंग त्याबद्दलचं माझं तोडकं-मोडकं ज्ञान सगळं अगदी गळून पडलं. 
भीम जसा पुढे जाऊ लागला तशी आम्हांला आमची गाडी मागे घेऊन त्याच्या बरोबरीने जाणे भाग होतं . थोडं  अंतर गेल्यानंतर आम्हांला तो पुन्हा दिसला आणि आता तर आम्ही त्याच्या अगदी टप्प्यात होतो- ८-१० फुटांवर ! Paparazzi जसे एखाद्या सेलिब्रिटींचा पिच्छा पुरवतात तसा आम्ही त्याच्या मागे होतो . पुरेसा प्रकाश नसल्यामुळे काही जणांच्या कॅमेऱ्याचे फ्लॅशही पडत होते. हे २-३ क्षण मात्र जराशी धडकी भरवणारे होते ! फ्लॅश त्याच्या डोळ्यावर चमकल्यामुळे हा चिडला आणि अंगावर धावून आला तर ?! तर आमचं काही खरं नव्हतं !त्याचं सगळ्यांत पहिलं सावज मी आणि श्रीधरच झालो असतो. त्याने आमच्याकडे पाहिलं. किंबहुना त्याने आमच्या through पाहिलं आणि तो थोडासा वळला आणि एक छोटासा पूल होता. तो त्याने उडी मारून ओलांडला आणि पलीकडे चालत गेला. तिथे त्याने हा सगळा त्याचा इलाखा आहे हे झाडावर लघवी करून आम्हांला त्याची जाणीव करून दिल्यासारखं केलं. आणि तो आमच्याकडे पाठ करून बसला. मग मात्र तिथून आम्ही  निघालो...  

                                                                              ७
 तर अशा तऱ्हेने वाघ दिसण्याची शक्यता नसताना आम्हांला भीम दिसला- ते ही इतक्या जवळून आणि सुमारे अर्धा तास ! खितौली मध्ये खूप दिवसांनी भीमने दर्शन दिलं होतं. आणि त्यावेळी नेमके तिथे आम्ही होतो. सफारीनंतर तिथल्या लोकांना  आम्ही भीमची ही सुरस कथा सांगितल्यावर सगळ्यांना आम्ही नशीबवान होतो असं वाटलं. चला... एकूण काय ट्रिपची सुरुवात छान झाली होती... 

Tuesday 16 May 2017

चंदा सा शीतल है उनका मन.... भाग २



                                                                           १

... तर आम्ही सोमवार, २३ जून २०१४ रोजी दुपारी एकच्या सुमारास सुमित्राताई भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या घराखाली येऊन थांबलो. माझ्या मनात वेगवेगळे विचार होते. एकीकडे माझं मन मला खात होतं की माझं काम सोडून मी हे सगळं करतोय. दुसरीकडे हा प्रवास कसा होईल याबद्दल माझ्या मनात प्रचंड उत्साह आणि कुतूहल होतं. हे सगळं मला खूप थ्रिलिंग वाटत होतं. आणि शिवाय दोन मोठ्या नामांकित कलाकारांबरोबर प्रवास करण्याचं नाही म्हटलं तरी थोडंसं दडपणही आलं  होतं. आम्ही आलोय आणि खाली थांबलोय हे सांगायला आईने सुमित्राताईंना फोन केला. तर त्यांनी अतिशय आग्रहाने आम्हांला वर त्यांच्या घरी बोलावलं. या निमित्ताने घर बघणं होईल असं त्या म्हणाल्या. हे अगदीच अनपेक्षित होतं. खरं तर आम्ही बाहेरच्या बाहेरही जाऊ शकलो असतो. आणि त्यात काही गैरही नव्हतं. पण त्यांच्या या कृतीतून त्यांची आपुलकी दिसून आली.
दोन फ्लॅट्स जोडून एक फ्लॅट अशी त्यांच्या घराची रचना होती. प्रशस्त हॉल अगदी मनापासून सजवलेला होता. पण तरीही त्यात कुठे भपका नव्हता. सारखं वाटत होतं की हे सगळं आपण कुठेतरी पाहिलेलं आहे. मग एकदम लक्षात आलं - हे घर 'अस्तु' मध्ये दिसलं होतं! सुमित्राताईंनी व्यक्तीश: फिरून आम्हांला घर दाखवलं. त्यात एक छान टेरेस होतं- त्यात बसायला मेज होता आणि संपूर्ण टेरेसभर कुंड्यांमध्ये लावलेली हिरवीगार झाडं होती. एका खोलीत कॉम्प्युटरवर 'माझी शाळा' या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर त्यावेळी चालू असलेल्या मालिकेच्या संकलनाचं काम सुरु होतं. त्या टीमची आमच्याशी ओळख करून देण्यात आली. नंतर सुनील सुकथनकरांनी आम्हांला चहा आणून दिला. त्यानंतर आम्ही निघालो. विशेष म्हणजे जाताना त्यांनी कोणीच घराचं  दार बंद केलं  नाही किंवा आत काम करत असलेल्या टीमला काही तशा सूचनाही दिल्या नाहीत. एकूणच सगळीकडे सहजता आणि मोकळेपणा होता. म्हणजे जेवढं ते घर त्यांचं होतं तेव्हढंच त्या टीमचंही होतं असं मला जाणवलं. हे खूपच अद्भुत होतं. सुमित्राताई म्हणाल्यादेखील- आमचं घर हे आमच्या टीमसाठी आणि मित्रमंडळींसाठी नेहमीच उघडं असतं.

                                                                           २

सुनील सुकथनकर त्यांची टोयोटा क्वालीस गाडी घेऊन आले. ते स्वतः ड्राईव्ह करत होते. त्यांच्या शेजारी मी, मधल्या  सीट्स वर माझी आई आणि सुमित्राताई असा आमचा प्रवास सुरु झाला. त्यांच्या घरच्या अनौपचारिक वातावरणामुळे असेल माझ्यावरचं दडपण खूपच कमी झालं आणि संपूर्ण प्रवासभर(मुंबईला जाताना आणि दुसऱ्या दिवशी तिथून परत येताना) आमच्या छान गप्पा झाल्या. खरं तर ते दोघेही हातचं राखून, जेवढ्यास  तेवढं बोलू शकले असते. पण असं त्यांनी केलं नाही. आता विचार करता मला असं वाटतं आपण संपूर्ण प्रवासभर बोलत राहून आणि त्यांना बोलायला लावून त्यांना त्रासच दिला असणार. एकाच वेळी त्यांच्या मनात कितीतरी वेगवेगळ्या गोष्टींवर विचार चालू असणार- 'माझी शाळा' ही मालिका (ज्याचं एका भागाचं शूटिंग नुकतंच संपवून संकलनाचं काम चालू होतं), त्या संध्याकाळी होणारं कथावाचन आणि त्या पुढच्या शक्यता वगैरे... अशावेळी थोडासा एकांत हवा असणं स्वाभाविक आहे. आणि त्यात माझी सततची बडबड ! पण दोघांनीही कुठल्याही प्रकारे आपण कंटाळलो आहोत, वैतागलो आहोत किंवा आता आपण बोलायचं थांबू या हे अजिबात दाखवलं नाही. आणि अतिशय शांतपणे, मनमोकळेपणाने, कुठलाही attitude न दाखवता ते आमच्याशी बोलत राहिले. अधूनमधून सुमित्राताई गाडी चालवत असलेल्या सुनील सुकथनकरांना काळजीयुक्त स्वरात विचारत-"सुनील, तू ठीक आहेस ना? तुला झोप तर येत नाही ना? झोप येत असेल तर आपण थांबू या का थोडा वेळ ?" मला या गोष्टीचं मात्र खूप गिल्ट आहे. जाताना आणि येतानाही संपूर्ण वेळ सुनील सुकथनकरच गाडी चालवत होते. माझं काही धाडस झालं नाही विचारायचं की मी गाडी चालवू का? कारण एक तर क्वालीस गाडी माझ्या सवयीची नव्हती. आणि दुसरं म्हणजे इतक्या मोठ्या कलाकारांना घेऊन एक्स्प्रेस वे वर सवयीची नसलेली गाडी चालवणं मला चांगलंच रिस्क वाटत होतं. पण यामुळे झालं असं की मी त्यांचा ड्रायव्हिंग ताण शेअर करू शकलो नाही.

                                                                               ३

प्रवासात झालेल्या आमच्या गप्पा हा माझ्यादृष्टीने एक अतिशय समृद्ध अनुभव होता. सिनेमा या दृक-श्राव्य  माध्यमाचा उपयोग प्रत्येक जण आपापल्या उद्दिष्टांप्रमाणे करत असतो. काही जणांना हे फक्त करमणुकीचं माध्यम वाटतं. काहींना तो फक्त पैसे कमावण्याचा एक उद्योग वाटतो. पण हे माध्यम असं आहे की जे एकाच वेळी खूप लोकांपर्यंत पोचतं. म्हणूनच सिनेमा या माध्यमाचा खुबीनं वापर करून वेगवेगळे सामाजिक प्रश्न आणि त्यांची उत्तरं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम या दोघांनी अतिशय निष्ठेनं केलेलं आहे. म्हणूनच त्यांचा सिनेमा हा meaningful/purposeful  आहे असं मला वाटतं.
नुकताच पुरस्कार मिळालेला  नैराश्यावर आधारित चित्रपट 'कासव',
स्किझोफ्रेनियावर आधारित 'देवराई', अल्झायमरवर आधारित 'अस्तु', कोड या त्वचाविकारावर आधारित 'नितळ', तसंच माहितीचा अधिकार या कायद्याविषयी 'एक कप च्या', भ्रष्टाचारविरोधी आंदोलनावर आधारित 'हा भारत माझा' ही त्यापैकीच काही ठळक उदाहरणं ! सुरुवातीला डॉक्युमेंटरी/शॉर्ट फिल्म्स  आणि नंतर पूर्णवेळचे सिनेमे असा त्यांचा २५ वर्षांहून अधिक काळाचा प्रवास आहे. अर्थात यासाठी दोघांनी पद्धतशीररीत्या काम केलं. सुनील सुकथनकरांनी १९८९ साली FTII मध्ये रीतसर प्रशिक्षण घेतलं. अशा प्रकारच्या सिनेमांना नेहमीच भेडसावणारा प्रश्न म्हणजे आर्थिक पाठबळ ! आहे त्या बजेट मध्ये पण तरीही गुणवत्तेत तडजोड न करता ते सिनेमे करत राहिले. उदाहरणार्थ- सुमित्राताई म्हणाल्या- आमच्या सिनेमात मेकअप प्रकार फारसा नसतो. म्हणजे मेकअपमन नसतो. कलाकार स्वत;च मेकअप करतात किंवा काही वेळा काहीच मेकअप नसतो. दुसरं उदाहरण त्यांनी 'हा भारत माझा ' या सिनेमाचं दिलं. बजेटच्या मर्यादेमुळे त्यांनी हा सिनेमा पुण्यातल्याच एका घरात चित्रित केला तोही त्या घरातल्याच उपलब्ध प्रकाशयोजनेत!
अस्तु या त्यांच्या बहुचर्चित सिनेमाच्या  ट्रेलरची लिंक इथे देत आहे-
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjxps3m1uDTAhXLL48KHRFWDQ0QtwIIJjAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DNY3cNmtFmaA&usg=AFQjCNEhi4K36x9USGvGxPGAkVAaxMzpag&sig2=ER4lv5Yp73xGQmSR1ez9ww
                                                                             
तसंच सुमित्राताई भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांच्या नावांची एक लिंक इथे देत आहे. त्यावरून असं लक्षात येईल की १९९५ च्या 'दोघी' पासून सुरु झालेल्या त्यांच्या या प्रवासात आजवर त्यांनी तब्बल १४ पूर्ण लांबीचे चित्रपट केलेले आहेत.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=2&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwj4yNa-hOLTAhXFM48KHXjhChYQFggtMAE&url=http%3A%2F%2Fwww.imdb.com%2Fname%2Fnm0837788%2F&usg=AFQjCNFaxpOgzfiwVhFRDej5pUTEvh-wTg&sig2=-sS6fFeKjzBYx8ufwMzvaw
                                                           

                                                                               ४

त्यांच्या अनेक चित्रपटांना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्कारांचं महत्त्व आहेच पण त्यापुढे जाऊन मला असं वाटतं की काहीशी अनवट वाट पत्करून सातत्याने चित्रपट निर्मिती करणाऱ्या या दिग्दर्शक द्वयी बद्दल फक्त चित्रपटसृष्टीच नव्हे तर एकूण समाजातही आदराचं स्थान आहे. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे किंवा काम करण्याची इच्छा नि:संकोचपणे व्यक्त केलेली आहे. या दोघांनीही या क्षेत्रात अनेक माणसं जोडलेली आहेत. फक्त सिनेमापुरतं व्यावहारिक नातं न राहता ते एक जिव्हाळ्याचं, स्नेहाचं नातं बनलेलं आहे. आणि म्हणूनच जितेंद्र जोशीसारख्या संवेदनशील कलाकाराला जेव्हा कळलं की  ज्या कथेवर आधारित अभिवाचनाचा कार्यक्रम तो करत होता त्याच कथेवर आधारित चित्रपट करण्याचा या दिग्दर्शक द्वयीचा मानस आहे, तेव्हा त्याने लगेचच ते अभिवाचनाचे प्रयोग बंद करायचं ठरवलं. त्याला वाटलं की सिनेमाची कथा लोकांना आधीच कळेल आणि सिनेमाबद्दलचं औत्सुक्य कमी होईल. सुमित्राताईंनी सांगूनही त्याने आपला निर्णय बदलला नाही. ('हा भारत माझा' च्या शूटिंगच्या दरम्यान सेटवर जितेंद्र जोशी इतर कलाकारांच्या उत्तम नकला करून खेळकर वातावरण ठेवत असे असंही सुमित्राताई म्हणाल्या)
'एक कप च्या'च्या शूटिंगच्या दरम्यान (आणि खरं तर त्यांच्या सर्वच चित्रपटांच्या शूटिंगच्या वेळी) एक नियम होता. तो म्हणजे सेटवर स्पॉटबॉय पासून ते कलाकारांपर्यंत कोणीही पान-तंबाखू-सिगारेट इ घ्यायचं नाही. तसंच शाकाहारी जेवण घ्यायचं. 'एक कप च्या' च्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मात्र जेवणाच्याबाबतीत अपवाद करण्यात आला आणि सिनेमातले मुख्य कलाकार किशोर कदम यांनी स्वतः केलेल्या मांसाहारी पाककृतीचा आस्वाद सगळ्यांनी घेतला.

                                                                                  ५

या दोघांच्या सिनेमांमधलं मला जाणवणारं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लौकिक अर्थाने अभिनेते नसलेले लोक यांच्या सिनेमांत उत्कृष्ट काम करून जातात. त्यांच्या तीन सिनेमांमध्ये तर तीन लेखकांनी काम केलेलं आहे. 'वास्तुपुरुष' (२००२) मध्ये महेश एलकुंचवार, 'नितळ' (२००६) मध्ये विजय तेंडुलकर आणि 'एक कप च्या' (२००९) मध्ये लेखिका कमल देसाई यांनी काम केलेलं आहे. आणि तिघांनीही  नैसर्गिक अभिनय केलेला आहे. सुमित्राताई म्हणाल्या की  त्या नेहमी एखादा कलाकार डोळ्यासमोर ठेऊन ती ती भूमिका लिहितात. म्हणूनच या गोष्टीचं आणखी आश्चर्य वाटतं की त्यांना ही दिग्गज लेखक मंडळी अभिनेते म्हणूनही दिसली. त्यांच्यातल्या अभिनयाचं potential त्यांना जाणवलं. अभिनयाचा अनुभव नाही म्हणून 'नितळ' सिनेमाच्या वेळी आधी विजय तेंडुलकर काम करायला तयार होत नव्हते. नंतर ते तयार झाले पण त्यांनी सांगितलं की ते संवाद वगैरे काही पाठ करणार नाहीत. त्यांचे ते संवाद प्रसंगानुरूप म्हणणार. मग त्यांना सांगण्यात आलं की सुमित्राताईंनी लिहिलेले संवाद एकदा बघा तरी ! संवाद बघितल्यावर मात्र ते मनापासून तयार झाले. विशेष म्हणजे त्यांचं पाठांतर आणि रिहर्सल अभिनेत्री दीपा श्रीराम यांनी घेतलं. हे दृश्य किती गोड असेल नाही ! अनेकदा 'मेकिंग ऑफ अ मूव्ही' हा कुठलाही चित्रपट तयार करतानाचा/त्या प्रोसेस चा चित्रपट काढण्यात येतो. तसा  जर 'नितळ' या सिनेमाचा काढला असता तर मला वाटतं हे दृश्य त्यातलं highlight ठरलं असतं. स्वतः एक प्रथितयशी लेखक, नाटककार, अनेक यशस्वी चित्रपटांचे पटकथाकार-संवाद लेखक असलेले विजय तेंडुलकर आपली सगळी बिरुदं बाजूला ठेऊन, आपलं कुठलंही मत न लादता, दिलेले संवाद मनापासून पाठ करताहेत. अभिनेत्याच्या भूमिकेला न्याय देत आहेत !





या ब्लॉगला ज्या गाण्यावरून (थोडेफार वेगळे शब्द वापरून) नाव दिलं आहे ते मूळ गाणं इथे देत आहे. गाणं 'नितळ' चित्रपटातलं आहे आणि त्याचे गीतकार सुनील सुकथनकरच आहेत !
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=9&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjB98Sf2ODTAhWLuo8KHU6GDrkQtwIIRzAI&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DDDE6S4Qae9o&usg=AFQjCNFmDTzSR3L-rRIxlRdU9DLIyjEJ_g&sig2=21-F_JAYTZGHN88IIdXI2w