Friday 27 June 2014

Kashmir Diary 7

Bollywood and Kashmir-2

On our way to Pahalgam from Shrinagar, we came across this temple. It is actually in complete ruins. But still from its huge structure & pillars, it could attract a lot of visitors. This was Lord Vishnu temple at Avantipora situated 30 kms from Shrinagar in Pulwama district. Built by King Avantivarman (AD 855-883), we were told by the local guide over there, that the huge silver idol of the Lord was taken away by the British. Carved on the walls of the temple are sculptures of nine planets & also Lord Shiva & Ganga. Most of it was beyond recognition & even if the guide tried to fill in those gaps, it was difficult to imagine. I don't know why but the temple & its surroundings reminded me of the Konark Sun temple that we had visited in 1980. The guide said that Avantipora temple was destroyed not by Muslims but because of a powerful earthquake. But internet references suggest a different story. It was, according to these references, destroyed by Muslims. Incidentally, this guide was not a Muslim but a Sardar & he was talking a few lines in Marathi as well ! It was he who told us that the song from ' Aandhi ' was shot here. This was a pleasant surprise & when I checked, I thought he was indeed correct. Again this song seems to have been shot in two locations. The first part is shot at Avantipora. He also said that the last part of the film 'Guide ' was also picturized here.( But this could not be verified) Posting here the photos of the temple & also the song-









https://www.youtube.com/watch?v=8-HnmVg0-O8

And this surely must be Gulmarg... sans Gondola of course...
https://www.youtube.com/watch?v=krdVhzD2THw

  

For our stay in the houseboat we chose Nagin Lake over Dal Lake & it was indeed a wise decision. Dal lake was stinking as was crowded with thousands of houseboats. Comparatively Nagin lake was quiet & peaceful & relatively clean as well. At least there was no bad smell in the air. Nagin lake is the location for many a movies-such as 'Mission Kashmir'  & 'Jab Jab Phool Khile '. 
Here in this song,'Pardesiyon se na akhiya milana', in the beginning you see Nagin lake & later on you also see Pari Mahal overlooking the city of Shrinagar & Dal lake. - which is a seven terraced garden built by Darah Shikoh, son of Mughal Emperor Shah Jahan.

Nagin Lake 
View from Pari Mahal

Pari Mahal 
 And here's the song-
https://www.youtube.com/watch?v=7gzZPoylPI4

(P.S: Shashi Kapoor looks like a perfect Kashmiri!)

No mention on Bollywood & Kashmir could be complete without this song- 'Ye chand sa roshan chehra'  from Kashmir ki Kali, which according to me is shot at Dal Lake. 


                                           




Signing off with the link to this song....
https://www.youtube.com/watch?v=VueN49P7JyU


                                                                                                                       ( to be contd....)



Friday 20 June 2014

Kashmir Diary 6

Bollywood and Kashmir

One of my friends Shrirang Oak sent me a link to the song from 'Bemisaal', 'Kitni khoobsoorat ye tasveer hai.. ye Kashmir hai', when he came to know that we were going there. A very sweet gesture this, made me to think of other songs picturized over there. That turned out to be quite an exhausting task. There were far too many songs shot at the various picturesque locations in Kashmir. In fact until the turbulent phase in Kashmir in late 80s & early 90s, it seemed a perfect place to shoot not just the film songs but even entire movies. Later of course the delicate situation made it impossible to shoot & after 'DDLJ', the fascination for shooting in Switzerland grew & Yash Chopra became the unofficial brand ambassador for Switzerland.


During our stay in Kashmir, we came across so many locations that gave us a feeling of deja vu- we had seen this valley before in some movie... this bridge on the river in some other... the snow-capped mountains, the tall rows of pine trees, flowing rivers & their wonderful banks, serene lakes, beautiful flowers & well maintained gardens.. everything was just breathtaking !  I remember when we were returning from a trip to Aru valley, our driver pointed out to a small bungalow on the slope of a mountain on the other of river Lidder where according to him film 'Love 86' (Govinda-Neelam starrer) was shot. It seemed one of the most unlikely locations to shoot considering the slope of the mountain. Incidentally, the driver also added while in Aru & in Pahalgam that many scenes of 'Karma' were shot there.On our way to Pahalgam from Shrinagar, the other driver Shabbir showed us the location where 'Mere man ki ganga' from 'Sangam' was picturized. Almost every corner would have been fit for a movie song or shooting.Another point is that we had to rely heavily on the information provided to us by localites. So the authenticity of the information written here may not be 100%. If anyone adds/corrects to this, it is most welcome!


On this backdrop, I am going to undertake a gargantuan task here. I am going to post a few songs that have been shot in Kashmir & also post the photos of these places where we actually visited. In a way, this is just an extension of what Shrirang had sent to me. But I am also restricting to the places where we actually went & the photos we have of the places.

I would begin with this unlikely, yet good song from 1979 movie-'Prembandhan'. If you want to make a whirlwind trip of Kashmir, you won't find a better song than this to do so.Have a look...
https://www.youtube.com/watch?v=S9SjRIkexoM


Shalimar Garden 
Dal Lake

This song first takes you to Gulmarg, then to Shalimar garden, then Pahalgam plateau, then Dal lake, then (most probably) Sonamarg Cherry orchards all in a span of just 5 1/2 minutes! 


This next song is actually a combination of two places- first is the Shankaracharya Mandir in Shrinagar & second is at Gulmarg. Mumtaz sits on the footsteps of Shankarcharya temple in the opening shot of the song & later on the location changes. This is a famous song-' Jai Jai Shiv shankar ' from 'Aap ki Kasam '. The same temple is also seen in another song from the same film 'Zindagi ke safar mein.' Also the song 'Karvate badalte rahe' is shot in Gulmarg. At least 4 songs from this movie have been shot there. 

Shankaracharya Mandir
Since cameras were not allowed in the premises of the temple, we could only take the photo from our hotel which was exactly at the foothills. But for you to get an idea I am posting a borrowed photo.


Shoot site at Gulmarg


And here is the song-

https://www.youtube.com/watch?v=Mpy0UzbHNr0

While returning from Chandanwadi at Pahalgam, we went to the 'Betaab Valley.' Yes..named after the Sunny Deol-Amruta Singh movie. They say that this place was a remote, discrete location before the movie. But the film changed everything.So full credit to Rahul Rawail or whoever did the recce of this place. Now this area is also called Betaabwadi. Even after so many years after the movie, the place has actually immortalized it. I don't recollect any other film's location that has been converted as a park (with entry fee!) & become a place of tourist interest.'Betaab' is no 'Mother India' or 'Mughal-e-Azam' or 'Sholay' but still has this honour & privilege. And it is not as if they have kept the Sunny Deol house as it was seen in the movie. There is only a wooden foundation that is suggestive of it.They could have done better to preserve the memories of the movie. But the park as such is very nice & views of the valley wonderful!










Here is the song...
https://www.youtube.com/watch?v=BaavlSpk7bE

Will be back with some more next time...

(Photos by Akshay Apte. Inputs- Mugdha Apte)
                                                                                                                                                          (to be contd...)

Wednesday 11 June 2014

काश्मीर डायरी ५


भारतीय सैन्य, सैनिक, भारतीय पोस्ट . . . 


उडीच्या सैनिकी पोस्टची जागा तशी वैशिष्टयपूर्ण, खरं तर आपल्या दृष्टीने तोट्याची आहे. म्हणजे असं की तीन बाजूंनी डोंगर आणि तेही  शत्रू पक्षाच्या ताब्यातले आणि खाली एका बाऊलसारखी ही पोस्ट ! पोस्टकडे जाताना झेलम नदीच्या पलीकडे पाक व्याप्त काश्मीरच्या डोंगरांवर त्यांचे बंकरही दिसतात. म्हणजे त्यांना उंचीचा फायदा मिळत असणार गोळीबार करायला ! 

पोस्ट म्हणजे तरी काय - एका रांगेत असलेली बैठी घरं !  तिथे गेल्या गेल्या आम्हांला ही पाटी दिसली. 


तिथे पोचल्यावर आमची भेट सुभेदार महेंद्रसिंह यांच्याशी झाली. इथून पुढचा अर्धा -पाउण तास ते आमच्याबरोबर होते. टिपिकल सैनिकी पोशाख परंतु आवाज अगदी मृदू, मुलायम ! सैन्यातल्या माणसाला न शोभणारा ! काहीवेळा तर त्यांचं बोलणं आमच्यापर्यंत पोचतही नव्हतं. पावसाळी, ढगाळ वातावरण, गार वारा, पोस्टच्या आजूबाजूला असलेली झाडी आणि या सगळ्यावर कडी करणारं  एक अनामिक थ्रील आणि गूढ तणावही  ! कदाचित मला माझीच मनाची अवस्था नीट शब्दांत पकडता येत नसेल. . . पण त्यातल्या त्यात जवळचा शब्द हाच असू शकेल. समोर सगळीकडे शत्रूने बळकावलेला प्रदेश . . . नजरेच्या इतक्या जवळच्या टप्प्यात शत्रूचे दर्शन पहिल्यांदाच होत होते. जरी आपले सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यांपैकी एक असा लौकिक असलेले आणि पाहुण्यांची पुरेपूर काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडणारे असे असले तरी समोरचे सैनिक त्याउलट कुरापती काढणारे किंवा माथेफिरू असा लौकिक असलेले! यातून काही घडले तर ? हा कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात  विचार चालू होता. याला तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा! 
पोस्टच्या बाहेर एक बस थांबली होती. मुझफ्फराबाद-श्रीनगर या मार्गाची ती बस! बस रिकामी होती. तिकडून आलेले प्रवासी सामानाची तपासणी, कागदपत्रांची औपचारिकता या गोष्टी आपल्या पोस्टच्या एका इमारतीत करत होते. दोन्ही बाजूच्या काश्मीर मध्ये विखुरल्या गेलेल्या नातेवाईकांना एकमेकांना भेटण्याचा हा एक उत्तम मार्ग! दोन्ही देशातील तणाव निवळण्याच्या  दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाउल ! भारतीय पोस्ट आणि पलिकडची पाक व्याप्त काश्मीरची पोस्ट, मध्ये वाहणारी झेलम नदी आणि त्यावरील हा पूल ! दोन देशांना तसं म्हटलं जोडणारा, संवाद साधण्याची शक्यता निर्माण करणारा हा पूल ! मैत्रीचा पूल म्हणणं फारच रोमांटिक होईल. पण निदान शांतता आणि सौहार्द राखण्यास मदत करणारा, व्यापार आणि मानवी व्यवहार यांना चालना देणारा असा पूल ! म्हणून याचं नाव आहे- कमान अमन सेतू ! 

अमन सेतू हे समजलं, पण हे कमान का? हे नाव आधीही आमच्या मेजर बरोबरच्या गप्पांमध्ये आलं होतं. तेव्हा मी त्याचा अर्थ कमांड असा घेतला होता. पण सुभेदार महेंद्रसिंह यांच्याकडून कमान या नावाचा उलगडा झाला-
हा मार्ग तसा जुना आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून वापरातला ! १९४७ नंतर पाकिस्तानने या मार्गावरून भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता तेव्हा गढवाल रायफल्सच्या  लेफ्टनंट कर्नल कमानसिंह यांनी त्यांच्याजवळ कमी सैन्य असूनही अजोड शौर्य आणि साहसी नेतृत्वाच्या जोरावर शत्रूला नामोहराम केले होते. त्यांच्या या पराक्रमाच्या सन्मानार्थ त्यांना महावीरचक्र देण्यात आले होते. त्यांच्या स्मरणार्थ या पोस्टला हे नाव देण्यात आले. 
त्या बैठया घरांच्या थोडंसं पुढे चालत गेल्यावर तो पूल दिसला. पुलावर आपल्याबाजूने एक सैनिकी ट्रक आणि त्यांच्या बाजूने एक ट्रक असं दृश्य होतं. पुलाच्या दुरुस्तीचं काम आपल्या सैन्यातर्फे चालू होतं. आणि म्हणूनच या पुलावरून जड वाहतूक होत नव्हती.आम्हांला वाटेत दिसलेली ट्रकची रांग आणि ते ओस पडलेले सलामाबाद गाव याचे हे कारण होते. आपल्याकडच्या पुलाच्या डावीकडे भारतीय सैनिक सतत पोझिशन घेउन उभे होते, तर उजव्याबाजूला शांततेचं प्रतीक म्हणून पांढरा झेंडा लावला होता.पलीकडेही तसाच झेंडा होता. पोशाखावरून पुलावर काम करणारे सर्व भारतीय सैनिकच दिसत होते. एक सैनिक तर पुलाच्या खाली असलेल्या दगडी खांबावर उतरून बाहेरच्या बाजूने पुलाला रंग देण्याचे काम करत होता. 

महेंद्रसिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा पूल आपणच बांधलाय, त्याची डागडुजीही आपणच करतो. पुलाला आपण बाहेरून तिरंग्याचा रंग दिला होता. यावर पाकिस्तानने आक्षेप घेतल्यामुळे आता तिथे पांढरा रंग देण्याचे काम चालू होते. 
 भारतीय सीमांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली जी निदान मला तरी नवीन होती. शेजारी राष्ट्रांबरोबर आपल्या  ४ प्रकारच्या सीमा आहेत-
१) आंतरराष्ट्रीय सीमा (International  Borders)- या सीमांबद्दल फारसा तंटा-बखेडा नाही. उदा- पंजाब-राजस्थान लगतची सीमा.  
२) LoC - Line of Control - जम्मू आणि काश्मीर लगतची सीमा.  
३) L A C -Line of Actual Control - चीन-भारत सीमा.  
४) AGPL-Actual Ground Position Level -सियाचीन भागातील सीमा. 
यात फक्त LoC वर छोटया-मोठया चकमकी होतात. बाकीच्या ठिकाणी असं झालं तर ते एक प्रकारे युद्धच समजलं जाईल. 
समोरच पाकिस्तानी सैनिक दिसत होता. त्याचं बहुदा मोबाईल वर बोलणं चालू होतं. 

तसं म्हटलं तर अगदी हाकेच्या अंतरावर हे सैनिक आमने सामने असणार. त्यांच्यात कधी बोलणं होतं ? यावर महेंद्रसिंह यांनी दिलेलं  उत्तर मार्मिक होतं- "वो कुछ बात नही करते. कोई भी काम की बात हो तो हमें ही बोलना  पडता है. वो  सहमे सहमे से रहते है !" असं हसत हसत म्हणाले. "हम उनपर  भारी पडते है ना ! Ratio के हिसाब से वो अगर एक है तो हम बारह है. इसलिये उनको चुप रहना पडता है." आमच्या सारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी ते असं बोलले की खरोखरच परिस्थिती अशी आहे हे सांगता येत नाही. कारण वृत्तपत्रात तर बातम्या अशा येत असतात की ज्यावरून वाटावं की पाकिस्तान आपल्याला काही ना काही प्रकारे डिवचत असतो. 

पुलाजवळ फोटो काढून झाल्यावर आम्ही त्या बैठया इमारतीत गेलो. २५ जुलै २०११ ला इथे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराच्या खुणा दिसत होत्या. वातानुकूलन यंत्रणेमधून हा गोळीबार झाल्याचे महेंद्रसिंह यांनी सांगितले. 


















या खुणा बघताना अंगावर काटाच  आला! असा गोळीबार झाल्यास सैनिक ताबडतोब प्रत्त्युत्तर देउ शकतात, त्यासाठी दिल्लीच्या परवानगी ची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. असाच गोळीबार एकदा काही पर्यटकांवर  झाल्याचे ही त्यांनी सांगितले. अर्थात तेव्हा ते परवानगी नसताना तो पूल ओलांडायचा प्रयत्न करत होते म्हणून झाला असेही ते म्हणाले. 
बाहेर मस्त पावसाळी वातावरण असताना तिथे आम्ही गरमागरम कॉफी आणि पकोडे असा त्या वातावरणाला साजेसा पाहुणचार घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो. 


हे सगळं जरी असलं तरी या सैन्याकडे सामान्य जनता कशाप्रकारे बघते? आम्ही वाटेत बऱ्याच वेळा पाहिलं. सैनिक रस्त्यात उभे असले तरी त्यांच्याकडे रस्त्यावरची माणसं ढुंकूनसुद्धा बघत नाहीत. रस्त्यावरच्या एखाद्या पुतळ्याच्या अस्तित्वाची आपण दखलसुद्धा घेत नाही. तो रोजचाच असल्यामुळेही असेल असे. तसेच आम्हांला सर्वसामान्य माणसाचे या सैन्याच्या बाबतीत वाटले. ड्रायव्हर शब्बीर ला या सैन्याबद्दल विचारले असता त्याने एका वाक्यात सांगितले- "ये बहोत ज्यादा है. यहा इतनी फौज की जरूरत नही है. " त्याच्या म्हणण्याप्रमाणे या सैन्याचा होणारा खर्च हा सर्वसामान्य लोकांकडूनच वसूल केला जातो. तसेच त्याच्या म्हणण्याप्रमाणे  आजतागायत सैन्याकडे सुमारे २ कोटी एकर जमीन ताब्यात आहे. सर्व मोक्याची ठिकाणे सैन्याने बळकावली आहेत. जिथे पर्यटनाचा विकास होऊ शकतो तिथे सैन्य असल्यामुळे तिथे काहीच होणं शक्य नाही. एकूणच स्थानिक सरकार, पोलिस, भारत सरकार, सैन्य या सगळ्यांबद्दल त्याच्या मनात खदखदता असंतोष होता . रागच म्हणा ना ! "ये गवर्मेंट चोर है ." "पुलिस काम कुछ  करती नही सिर्फ पैसा खाती है " " ये इलेक्शन के  दौरान  बम ब्लास्ट मंत्री लोग ही करते है " अशी काहीशी पूर्वग्रहदूषित आणि generalization केलेली वाक्ये तो छातीठोकपणे टाकायचा. प्रत्येक घटनेकडे बघायचे त्याचे एक वेगळे व्हर्जन होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे काश्मिरी पंडितांना राज्यपाल जगमोहन यांनीच काश्मीर सोडून जायला सांगितलं कारण त्यांच्या जीवाला त्यावेळी धोका होता.पूर्वी एकूण लोकसंख्येच्या १०% असणारे पंडित आता जेमतेम १ % आहेत हे ही त्यानेच सांगितले होते. आता ते का परत येत नाहीत. यावरही त्याचे उत्तर होते-वो क्यू यहा आयेंगे? उनको सब जगह सरकारी  नौकरी मिलती  है." 
एकूणच नकळतपणे त्याच्यात आणि आमच्यात एक अंतर होते आणि ते आम्ही समजू शकत नव्हतो. त्याच्या मते एक संपूर्ण तरूण  पिढी या militancy च्या नावाखाली बरबाद झाली. अतिरेकींच्या नावाखाली कित्येक निर्दोष लोकांना उचलून नेण्यात आलं. कित्येकांचा अजून पत्ता नाही. कित्येक मारले गेले. "गलतिया तो सब लोग करते है लेकिन उसकी इतनी बडी सजा तो नही होती ना !" त्याच्या मनातल्या रागाचं तो कारणच मांडत होता. म्हणूनच जेव्हा त्याला -तुम्हांला कोणी निवड करायला सांगितली तर काय निवडाल असं विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला- "हमे १०० % आजादी चाहिये. ना इंडिया से जुडे रहेंगे ना पाकिस्तानसे ! यहा सब लोग यही चाहते है" पुढे मी त्याला माझ्या भौगोलिक, आर्थिक, राजकीय इ .ज्ञानाचा वापर करून सांगायचा प्रयत्न करत होतो की त्याचं कसं चुकतंय. पण तो बधला नाही. काश्मीर समस्या आणि त्याचे वेगवेगळे पैलू न समजताच काहीतरी बरळत राहणं हे काही राजकीय नेते करतात आणि सध्या Whatsapp वर अनेक असे संदेश फिरतात त्यांच्यात आणि माझ्यात फारसा फरक नव्हता हेच खरं ! 

(To be continued...)

Friday 6 June 2014

काश्मीर डायरी ४


भारतीय सैन्य, सैनिक, भारतीय पोस्ट . . . 


मला उडीला नेमकं का जायचं होतं ? खरं म्हणजे मी प्रकृतीने प्रखर, जहाल किंवा कडवा राष्ट्रभक्त वगैरे नाही. माझ्यात असा जाज्वल्य राष्ट्राभिमान सुद्धा नाही. तशा प्रकारच्या राष्ट्राभिमानात आवश्यक ठरणारं qualification माझ्यात नाही -पाकिस्तानला सतत शत्रू मानणाऱ्यातला मी नाही. माझ्यात काहींमध्ये असते तशी खुमखुमीही नाही. आमच्या ओळखीचे मध्यंतरी वाघा बॉर्डरला गेले होते. तिथे म्हणे त्यांनी राणा भीमदेवी थाटात जोरजोरात 'जय भवानी जय शिवाजी' 'भारत माता की जय' आणि 'तुम अगर हमारा एक मारोगे तो हम तुम्हारे चार मारेंगे' अशा घोषणा दिल्या. सात जन्मात मी कधी असं करू शकेन असं मला वाटत नाही. माझ्या प्रकृतीतच नाही ते ! पण एक आहे. . . कधीही आपले राष्ट्रगीत लागले की मला, का कोण जाणे, पण भरून येतं. आपल्या सीमेवर नेमकं काय असतं, तिथे काय काय होतं, कुठल्या  वातावरणात तिथे सैनिक सतत डोळ्यात तेल घालून उभे असतात हे मला पहायचं होतं आणि स्मृतीलाही दाखवायचं होतं. काश्मीरला जाण्याचा योग आला, आमच्या ओळखीचे मेजर अनायसे तिथे होते. सगळं काही आपसूक जुळून आलं आणि एक संस्मरणीय अनुभव घ्यायला मिळाला. 

वाघा बॉर्डर सारखं उडीला काहीच असणार नाही हे आम्हांला त्या मेजरने आधीच सांगितलं होतं. वाघा बोर्डर चा सगळा प्रकार म्हणजे एक प्रकारचं glamour आहे, त्यात एक नाट्यात्मकता असते असं ते म्हणाले. सैनिकांचं संचलन, ध्वज संध्याकाळच्या वेळी खाली उतरवणे वगैरे प्रकार असतात पण त्या मेजरना असं सुचवायचं होतं की हे सगळं playing to the gallery सारखं होतं. त्यांनी आम्हांला पूर्वसूचना देऊन ठेवली होती की उडीला असं काहीही पाहायला मिळणार नाही. पण तरीही एक थ्रिल असेल, ते  तुम्ही अनुभवा असं ते म्हणाले. यामुळे एकीकडे तिथे काय असेल याची उत्सुकता आणि दुसरीकडे काय नसणार याची माहिती अशा संमिश्र भावना घेऊन आम्ही उडीला जायला निघालो. 

उडीला जाण्याचा रस्ता म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे. पण त्या मानाने तो खूप छोटा आणि खडबडीत होता. 
सकाळची वेळ, हवेतला गारवा आणि काही ठिकाणी दुतर्फा झाडं असल्यामुळे छान, प्रसन्न वाटत होतं. 



सफरचंदाची झाडंही फुलांनी बहरली होती. याच फुलांच्या जागी फळं लगडल्यावरचं दृश्य किती सुंदर असेल याची आम्ही कल्पनाच करू शकत होतो  ! 


१०० कि. मी. अंतर असल्यामुळे वाटेत गप्पा चालूच होत्या. आमचा ड्रायव्हर शब्बीर आपणहूनही काही माहिती देत होता. त्यातल्या एका गोष्टीने अस्वस्थ व्हायला झालं. वाटेत एक गाव लागलं पलहलन नावाचं. एखाद्या गावाचं वैशिष्टय सांगावं अशाप्रकारे त्याने सांगितलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत या गावातील एकाही माणसाने एकदाही मतदान केलेले नाही. शब्बीरशी  या विषयावर फारसं काही बोलता आलं नाही पण या गोष्टीचा मला खूप त्रास झाला. अजूनही होतो. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षं होऊनही इथे लोकशाही पोचू शकली नाही, मुख्य प्रवाहात माणसं सामील होऊ शकली नाहीत  हे अपयश कोणाचं? केंद्र सरकार की राज्य सरकार? की हे ' यश' तथाकथित फुटीरतावादाचं ?

बारामुल्लाच्या पुढे गेल्यावर रस्ता हळू हळू वळणावळणांचा  होऊ लागला होता. रस्त्याच्या एका बाजूला भुसभुशीत मातीचे  डोंगर होते. 

हलकासा पाउस  पडून गेला होता. काही ठिकाणी दरड कोसळली होती. तिथे सैनिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करून देण्यात येत होता. तर दुसऱ्या बाजूला  झेलम नदी सतत मूक साथ करत होती. उडीच्या साधारण ७-८ कि. मी. अलीकडे एका बाजूने ट्रकची रांगच रांग दिसत होती. हे बहुदा त्या भारत-पाक व्यापाराचे असावेत. पुढे सलामाबाद(हो. . .  हेच नाव होते त्या गावाचे !) नावाचे गाव लागले. इथे सीमेपलीकडून येणाऱ्या ट्रकमधील मालाचे अनलोडिंग आणि पुढचे सगळे सोपस्कार होतात. पण आज अगदी व्यवहार पूर्ण ठप्प होते. एक चिटपाखरू ही नव्हते. त्याचे कारण पुढे उडीला गेल्यावर कळले. 

आणखी थोडं पुढे गेल्यावर अचानक उजवीकडे एक फलक दिसला- आम्ही चक्क LoC च्या बाजूने जात होतो ! म्हणजे या बाजूला भारताची हद्द, मधे  झेलम नदी आणि पलीकडे पाक व्याप्त काश्मीर ! 


(सर्व फोटो सौजन्य -अक्षय आपटे)

(क्रमश:) 

Thursday 5 June 2014

काश्मीर डायरी ३



भारतीय सैन्य, सैनिक, भारतीय पोस्ट . . . 


आम्ही उडीला ५ मे ला जाणार होतो. त्याच दिवशी स्मृतीचा (माझ्या मुलीचा ) वाढदिवस असतो. वाढदिवस मग तो पुण्यात असो की काश्मीरमध्ये, तो नेहमी केक कापूनच साजरा करायचा असा आमचा नियम !         ४ तारखेला दिवसभर सोनमर्गची ट्रीप आणि नंतर श्रीनगरमध्ये खरेदीत गेल्यामुळे केक आणणे काही जमले नाही. शिवाय तिच्या नकळत हे काम करायचे असल्यामुळे आम्हांला ते आधी करता आले नाही. शेवटी रात्री ८.३० वाजता आम्ही (मी आणि माझा मेहुणा सुनील ) ATM मधून पैसे काढायचे आहेत असं निमित्त सांगून बाहेर पडलो. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर समोरच दल लेक, ८.३० वाजता सुद्धा भरपूर गर्दी ! 


                                                                                     फोटो सौजन्य -अक्षय आपटे)

हॉटेलच्या आजूबाजूला सगळीकडे इतर हॉटेल्स आणि नथूज स्वीट्स हे मिठाई आणि चाट पदार्थांचं दुकान होतं. इथे बेकरी कुठेच दिसत नव्हती. कुणाला विचारावं असं वाटत असताना समोरच एक सैनिक उभा होता. त्यालाच बेकरीबद्दल विचारलं. तो सैनिक इथे जणू काही युद्धच चालू असल्याच्या पूर्ण वेशात होता. हातात मशीनगन आणि दल लेक कडे तोंड करून खडा पहारा देत होता. चेहरा मात्र काहीसा कंटाळलेला आणि निर्विकार होता. जाड मिशी आणि सावळा रंग . तो उत्तरेकडचा वाटत नव्हता. आम्ही (हिंदीत) विचारल्यावर त्याने अगदी मनापासून उत्तर दिले. बेकरी इथून चालत गेलं तर १/२ तासाच्या अंतरावर होती. या वेळी एवढं लांब चालण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. नथूज स्वीटसमध्ये मिळेल का असं त्या सैनिकाला विचारणं बरोबर नव्हतं. पण चालण्याचा कंटाळा वरचढ ठरला. तो म्हणाला कदाचित मिळेलही पण खूप महाग असेल. मग त्यानेच विचारले, "आप कहा से आये है?" "हम पूना से है " आमच्या मराठी लहजा असलेल्या हिंदीवरून त्याने ते आधीच ओळखले होते की काय माहित नाही. त्याची एकदम कळी खुलली. "ओह पूना से! पूना एक बढिया शहर है . मेरा ट्रेनिंग वही पर  हुआ था . मै वही से हू -नगर जिलेसे !" मग मी एकदम मराठीतच बोललो , "अहो म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे की !" तो ही आनंदून म्हणाला,"हो. . .माझं नाव संदीप शिंदे !" वा !काय मजा होती ! एवढा वेळ उगाचच आम्ही हिंदीत बोलत होतो. भारताच्या उत्तरेकडच्या टोकाला, अनोळखी ठिकाणी आम्ही असे तिघे मराठी भेटलो होतो ! आणि मराठी माणसांबद्दल अशी तक्रार असते की सैन्यात त्यांची संख्या कमी असते .पण या आधी भेटलेले मेजर मराठी, हा सैनिक मराठी आणि पुढे उडीलाही याच मेजरच्या बदलीनंतर नवीन आलेलाही मराठीच ! खूप छान वाटलं ! संदीप शिंदे म्हणाले की ते इथे २००७ पासून आहेत. कुटुंब-मुलं गावी ! शिवाय सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणामुळे सुट्टीही मिळणं दुरापास्त होतं. डिसेंबर शिवाय घरी जात येणार नाही असं म्हणाले. तेव्हा केक घेण्याच्या 'गडबडीत ' असल्यामुळे कदाचित माझ्या ते लक्षातही आलं नाही. पण आता विचार करता माझी मलाच लाज वाटते. मुलीच्या वाढदिवसाच्या एका केकसाठी मी केव्हढा obsessed होतो आणि इथे हा माणूस महिनो न महिने घरीही जाउ शकलेला नव्हता ! 
संदीप शिंदेंनी आम्हांला चालत जायचं नसेल तर रिक्षाने जा असं सुचवलं. समोरच रिक्षा उभी होती. पूर्णपणे बंदिस्त ! एक क्षण वाटलं एवढ्या रात्री अशा रिक्षेतून जाणं ठीक राहील ना ? आम्ही त्यांना तसं विचारलंही. "हो. . . हो ! बिनधास्त जा . काही प्रॉब्लेम नाही. एकदम सेफ आहे." आम्ही रिक्षात बसल्यावर त्यांनी रिक्षावाल्याला आम्हांला कुठे सोडायचं याचा पत्ताही सांगितला ! 
इतकं सगळं करून केक कुठे मिळालाच नाही. शेवटी त्याच रिक्षाने नथूज  स्वीटस पाशी परत आलो. तिथूनच पेस्ट्री घेतल्या. दुकानातून बाहेर पडताना शिंदे कुठे दिसले नाहीत.रस्त्यावरच मिलिट्रीचे एक वाहन उभे होते. त्यात शिंदेना बसताना पाहिले. बहुदा आजची त्यांची ड्युटी संपली असावी !

(क्रमश:)

Tuesday 3 June 2014

काश्मीर डायरी २


भारतीय सैन्य, सैनिक, भारतीय पोस्ट . . .
1

काश्मीर सहलीच्या पहिल्याच दिवशी आमच्या दृष्टीने एक अघटित घडलं, जे आम्हांला सुखद धक्का देऊन गेलं. श्रीनगरला शंकराचार्य मंदिर पाहून परत येत असताना आम्हांला चक्क बिबट्या दिसला ! ' कान्हा' च्या जंगलात बिबट्या अगदी ओझरता दिसला होता.तिथे वाघही एकदाच दिसला होता आणि तोही जखमी असल्यामुळे त्याच्या गळ्यात पट्टा लावलेला होता. ' कॉर्बेट' च्या जंगलात तर वाघ अजिबातच दिसला नव्हता . जिथे बघायला गेलो  तिथे दिसला नाही आणि श्रीनगरला असा अवचित दिसला ! ते ही कसा? भटके कुत्रे कसे गाड्यांच्या मागे लागतात तसा हा आमच्या गाडीच्या मागे झडप घातल्यासारखा आला. आम्ही तसेच पुढे गेल्यावर हा मागे फिरला. काहीसा अस्वस्थ वाटत होता . 



येणाऱ्या प्रत्येक गाडीवर असाच हल्ला करायचा. भुकेला होता की ती मादी होती आणि जवळपास तिची पिल्लं होती आणि तिला माणसांकडून धोका आहे असं वाटत होतं का? हे मात्र काही कळू शकलं नाही. छान १५-२० मिनिटं दर्शन देऊन तो पसार झाला . तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावून, तिथल्या देवाच्या दर्शनाने एखाद्या भक्ताला जो अपरिमित आनंद होत असावा, अगदी तसाच आनंद या बिबट्याला पाहून झाला होता . सुरुवातीलाच असं थ्रील अनुभवल्यावर पुढे आणखी काय बघायला मिळणार आहे याची उत्सुकता वाढू लागली होती. 
यानंतर विविध रंगांची उधळण करणारी ट्युलिपची फुलं बघायला मिळाली. हॉलंडच्या कुकेनहोफ बागेत(' देखा एक ख्वाब' फेम) असतील एवढी नाही पण तरी नजर पोचते तिथपर्यंत फुलंच फुलं पाहून मन अगदी तृप्त झालं होतं .







           
                                                                                                                         (सर्व फोटो सौजन्य -अक्षय आपटे)

अशा काहीशा भारलेल्या, भारावलेल्या मन:स्थितीत संध्याकाळी आमच्या ओळखीचे सैन्यातील मेजरना आम्ही भेटलो आणि त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या. काश्मीर मधले त्यांचे अनुभव, इथली माणसं याबद्दलची त्यांची निरीक्षणं खूप उद्बोधक होती. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की काश्मिरी लोकांकडे स्वतः चं घर आणि छोटीशी का असेना पण जमीन असते. इथे चोऱ्या वगैरे प्रकार फारसा होत नाही. तुमच्याकडे एक वेळ जास्त पैसे मागतील पण चोरी करणार नाहीत. आम्हाला पहिल्या दिवसापासूनच सगळीकडे भारतीय सैनिक दिसत होते. रस्त्यावर उभे, कधी इमारतींच्या छतावर, कधी वाळूच्या पोत्यांच्या ढिगामागे! त्यांच्या असण्याने आम्हांला सुरक्षित वाटत होतं.  काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचे असणे आणि इतक्या प्रमाणात  असणे हे आवश्यकच होते असं मेजर म्हणाले. भारत -पाक सैन्याची तुलना करता आपण 'त्यांच्यापेक्षा' नक्कीच वरचढ आहोत असेही ते म्हणाले. काश्मीर प्रश्न हा जटील खराच पण या विषयावर नि:पक्षपणे कोणी लिखाण केले आहे का असे विचारल्यावर त्यांनी लगेच पत्रकार एम. जे.अकबर यांनी लिहिलेलं 'Kashmir :  Behind the Vale' हे  पुस्तक सुचवलं.  विषय कसा कोण जाणे पण इथे ब्रिटिश सत्तेच्या खुणा का दिसत नाहीत इकडे वळला. सर्वसाधारणपणे सगळीकडे (आणि विशेषत:थंड हवेच्या ठिकाणी) ब्रिटीशकालीन इमारती किंवा त्यांची नावे असं काहीतरी दिसतं. पण श्रीनगरमध्ये  असं काही दिसलं नाही. त्यावर मेजर म्हणाले याला कारण कलम ३७० ! हे कलम खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहे. अर्थात तेव्हा ते कलम ३७० या नावाने ओळखलं जात नव्हतं. ३७० मधील काही महत्त्वाच्या तरतुदी त्यावेळी होत्या. काश्मिरी राजाला अशी भीती होती की इथली जमीन इंग्रज बळकावतील. या तरतुदीमुळे ते होऊ शकलं नाही. पुढची माहिती तर खूप रोचक होती- यातूनच ' हाउस बोट' चा जन्म झाला. जर इंग्रज जमीन घेऊ शकत नव्हते तर त्यांनी शक्कल लढवून ही पाण्यावरची घरे बांधली! आम्ही ज्या उडी ला जाणार होतो तिथलीही माहिती त्यांनी सांगितली. तिथे दर सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही बाजूंनी माल वाहतूक होते. व्यवहार पैशात होत नाही तर पूर्वीच्या काळाप्रमाणे मालाच्या बदल्यात माल असा होतो. २००३ सालापासून इथून पाक व्याप्त काश्मीर कडे जाणारी बस चालू झाली आहे. म्हणजे सीमेवर फक्त तणाव किंवा गोळीबारच होतो असं नाही तर सकारात्मक आदान-प्रदानही होते हे ऐकून बरे वाटले. यामुळे उडीला जाण्याची उत्कंठा अजूनच वाढली. 

(क्रमश:)