आज,१६ जानेवारी, संगीतकार ओ पी नय्यर यांची जयंती (जन्म-१९२६) त्यानिमित्त हे लिखाण...
-१-
क्वचितच असं होतं की एखाद्या संगीतकाराच्या कारकीर्दीवरून त्याच्या स्वभावाचा, खरं तर त्याच्या अटिट्यूडचा अंदाज येतो.
ओ पी नय्यर हे यापैकीच! तुम्हांला पुरावेच हवे आहेत का? तर हेच बघा ना...
१) कुठल्या कारणासाठी का असेना पण शेवटपर्यंत एकदाही लता मंगेशकर ओ पी कडे गायल्या नाहीत. त्यांनी लता शिवायही यशस्वी संगीतकार होऊन दाखवलं.
२) लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही त्यांनी नाकारला. कारण त्यांचं मत होतं की संगीतकार गायकाला मोठं बनवतो. म्हणून संगीतकार श्रेष्ठ! गायक नव्हे ! गायकाच्या नावाचा पुरस्कार त्यामुळेच त्यांनी नाकारला.
३) एका गाण्याच्या रिहर्सलला रफी उशीरा गेला म्हणून ओ पी त्याच्याशी भांडले आणि त्यामुळे रफी काही काळ त्यांच्याकडे गात नव्हता. रफीने त्यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली. त्यानंतरच तो पुन्हा त्यांच्याकडे गायला. यात मध्ये फक्त पाच वर्षे गेली!
२) तेव्हाचा आघाडीचा कवी साहिर ओ पी ला एकदा म्हणाला - "माझ्यामुळे एस डी बर्मन मोठे झाले. नाहीतर त्याआधी ते कोण होते?"
ओ पी आणि साहिर यांनी त्या आधी 'नया दौर', 'सोने की चिडिया' या सारखे गाजलेले चित्रपट केले होते. पण हे ऐकल्यानंतर ओ पी नी साहिर बरोबर कधीच काम करायचं नाही असं ठरवलं. त्यांच्याबद्दलही साहिर असंच बोलेल असं त्यांना वाटलं असावं. 'तुमसा नहीं देखा' आणि '12 O' Clock' या सिनेमांतून त्यांनी साहिरला बाहेर काढायला लावलं .

वरील उदाहरणांवरून लक्षात येईल की आपलं सांगीतिक करिअर पणाला लावून त्यांनी त्यांच्या स्वत्वाला जास्त महत्त्व दिलं. त्याची त्यांनी जबरदस्त किंमतही मोजली. हे अगदी self- destructive होतं. पण ते नेहमीच आपल्या terms वर जगले. म्हणूनच ते एक
अटिट्यूडवाले संगीतकार होते.
-२-
'टांगा ठेक्याची गाणी देणारा संगीतकार' असा एक उगीचच नकारात्मक शिक्का ओ पी नय्यर यांच्यावर बसवण्यात आला आहे. तसं बघितलं तर या ठेक्याची त्यांची ही काही प्रसिद्ध गाणी आहेत-
'टांगा ठेक्याची गाणी देणारा संगीतकार' असा एक उगीचच नकारात्मक शिक्का ओ पी नय्यर यांच्यावर बसवण्यात आला आहे. तसं बघितलं तर या ठेक्याची त्यांची ही काही प्रसिद्ध गाणी आहेत-
१) मांग के साथ तुम्हारा- नया दौर
२) पिया पिया पिया मोरा जिया पुकारे- बाप रे बाप
३) होले होले साजना धीरे धीरे बालमा- सावन की घटा
२) पिया पिया पिया मोरा जिया पुकारे- बाप रे बाप
३) होले होले साजना धीरे धीरे बालमा- सावन की घटा
या पेक्षा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची गाणी ओ पी नी दिली. त्यांनी पंजाबी ढंग आणि पाश्चिमात्य संगीत याचा सुंदर मिलाफ केला. उडत्या चालीची गाणी तर दिलीच पण शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेले नसताना देखील शास्त्रीय रागांवर आधारित अनेक गाणी दिली. नाइट क्लबची sensuous गाणी दिली तशीच अनेक विनोदी गाणी दिली. Rhythm King असा लौकिक असणाऱ्या या संगीतकारानं काही संथ आणि ठहराव असलेलीही गाणी दिली, ज्यात काही वेळा ठेका असून नसल्यासारखाच वाटतो.
ओ पीच्या या वैशिष्ट्यांचा धावता आढावा-
-३-
-३-
ओ पी च्या गाण्यात वापरण्यात आलेली काही वाद्ये आणि ती गाणी-
१) हार्मोनियम -
लेके पहला पहला प्यार - CID
लेके पहला पहला प्यार - CID
https://www.youtube.com/watch?v=vVmShhhiPPI
कजरा मोहब्बतवाला- किस्मत
कजरा मोहब्बतवाला- किस्मत
बहुत शुक्रिया बडी मेहरबानी
२) मेंडोलिन + सारंगी-
कहीं पे निगाहें- CID
कहीं पे निगाहें- CID
३) सरोद + सारंगी-
आप यूंही अगर हमसे मिलते रहे- एक मुसाफिर एक हसीना
आप यूंही अगर हमसे मिलते रहे- एक मुसाफिर एक हसीना
४) सॅक्सोफोन-
है दुनिया उसीकी जमाना उसीका- काश्मीर की कली
है दुनिया उसीकी जमाना उसीका- काश्मीर की कली
५) क्लॅरिनेट+ बासरी-
बूझ मेरा क्या नाम रे- CID
बूझ मेरा क्या नाम रे- CID
६) संतूर-
जाईए आप कहाँ जायेंगे- मेरे सनम
ये चाँद सा रोशन चेहरा - काश्मीर की कली
जाईए आप कहाँ जायेंगे- मेरे सनम
ये चाँद सा रोशन चेहरा - काश्मीर की कली
७) गिटार-
पुकारता चला हूँ मैं -मेरे सनम
पुकारता चला हूँ मैं -मेरे सनम
८) Castanets-
आईए मेहरबान- हावडा ब्रिज
आईए मेहरबान- हावडा ब्रिज
९) बीन-
एक परदेसी मेरा दिल ले- फागुन
एक परदेसी मेरा दिल ले- फागुन
१०) पियानो-
आपके हसीन रूखपे- बहारें फिर भी आयेंगी
आपके हसीन रूखपे- बहारें फिर भी आयेंगी
-४-
ओ पी नय्यर यांची शास्त्रीय संगीतावर आधारित काही गाणी -
१) तू है मेरा प्रेमदेवता- कल्पना - राग ललत
१) तू है मेरा प्रेमदेवता- कल्पना - राग ललत
https://www.youtube.com/watch?v=p0y61M6nOe0
२) छोटासा बालमा- रागिणी-राग तिलंग
३) बेकसी हद से जब गुजर- कल्पना- राग देस
४) इन्साफ का मंदिर है ये- नया दौर- राग भैरवी
५) रातभर का है मेहमान अंधेरा- सोने की चिडिया- राग जोगिया
६) इशारों इशारों में - काश्मीर की कली- राग पहाडी
७) जाईए आप कहाँ जायेंगे - मेरे सनम- राग पिलू

https://www.youtube.com/watch?v=wu8PNqsMsTM
८) पुकारता चला हूँ मैं- मेरे सनम- राग किरवानी
९) आना है तो आ - नया दौर- मिश्र बसंत
१०) आपके हसीन रूख पे- बहारें फिर भी आयेंगी- राग यमन
८) पुकारता चला हूँ मैं- मेरे सनम- राग किरवानी
९) आना है तो आ - नया दौर- मिश्र बसंत
१०) आपके हसीन रूख पे- बहारें फिर भी आयेंगी- राग यमन
-५-
आणि जाता जाता ही ठहराव असलेली ओ पीची काही गाणी-
१) प्रीतम आन मिलो- Mr.& Mrs. 55- गीता दत्त (तसेच सी. एच. आत्मा)हे गाणं ओ पी यांच्या पत्नी सरोज नय्यर यांनी लिहिलंय. याचं गैरफिल्मी version सी. एच. आत्मा यांनी गायलं होतं. नंतर हे गाणं सिनेमात घेतलं गेलं.
२) प्यार पर बस तो नहीं है- सोने की चिडिया- तलत मेहमूद- आशा
प्रेमात पडलेल्या माणसाची संभ्रमावस्था, त्याच्या जीवाची तगमग, त्याची हुरहूर साहिरने शब्दांत अचूक पकडली आहे. तलतचा मखमली आणि काहीसा कापरा आवाज ही अवस्था छान व्यक्त करतो. कमीत कमी वाद्यं गाण्याचा गहिरेपणा वाढवतात. यात आशाला केवळ आलापी आहे, एकही शब्द नाही. पण त्यातून तिनं एक आश्वासकता व्यक्त केली आहे. एक परिपूर्ण गाणं !

३) आपके हसीन रूख पे - बहारें फिर भी आयेंगी - रफी
ही एक गझल आहे आणि रफीने अशाप्रकारे गायलीय की समजून यावं की गाणं धर्मेंद्र वर चित्रित करण्यात आलंय.
४) चैन से हमको कभी- प्राण जाए पर वचन न जाए - आशा
हे आशा - ओ पी यांचं शेवटचं गाणं ठरावं हे किती prophetic आहे! यानंतर ओ पी यांची कारकीर्द जवळपास संपली. आशाची जागा दुसऱ्या कुठल्याच गायिका घेऊ शकल्या नाहीत. या गाण्यातली बासरी लाजवाब आहेच शिवाय गाण्याबरोबर व्हायोलिन वाजताना ऐकू येते. त्याने sadness मध्ये भरच पडते. या गाण्यात तालवाद्य तसं कुठलंच नाही. Steel triangle याचाच ठेका आहे. Rhythm King असलेल्या नय्यर यांचा हा rhythm चा (न) वापर उठून दिसतो.