मला पक्षीनिरीक्षणाची थोडीफार आवड आहे. पक्षी दिसण्यापूर्वी बर्याचदा त्याचा आवाज आधी ऐकू येतो. यामुळे मला आवाजाचा वेध घेण्याची सवय लागली आहे. सध्याच्या लॉकडाऊन दरम्यान याचा मला खूप उपयोग झाला आहे. तसंही सध्या(माझ्यासह)प्रत्येकाकडे वेळ आहे. बरेचजण घरून काम करत आहेत. त्यामुळे आजूबाजूचा आवाज अचानक वाढला आहे. आम्हांला आवडो अथवा नाही,हवे असो की नाही, आमच्या घरात वेगवेगळ्या दिशेने आवाज आदळत आहेत! त्या आवाजांचीच ही काही निरीक्षणे!माझ्यावर विश्वास ठेवा,यापैकी कोणतेही निरीक्षण काल्पनिक नाही! जर आपण विचार करत असाल की मलाच इतके सगळे आवाज कसे ऐकू येतात... तर या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलेले आहे!
लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दिवसांत सर्वप्रथम आसमंतात 'थाली बजाओ'चा आवाज घुमला.आजही मला तो दिवस आठवत आहे .. लोकांमध्ये किती उत्साह होता! अगदी उत्सवाचे रूप आले होते त्या दिवसाला!लोक जोरजोरात थाळ्या वाजवत होते ..आणि टाळ्या देखील! अर्थात मी यात भाग घेतला नाही. फक्त हे सर्व कोण करत आहे हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो तेव्हा मला आमच्या शेजारच्यांनी पाहिले. आधी मला वाटलं की माझी बायको आणि मी, आम्ही दोघेही आरोग्य सेवेत आहोत म्हणून आमच्या आदरार्थ ते आमच्याकडे पहात टाळ्या वाजवत होते! पण तसे नव्हते. आम्ही या महान राष्ट्रीय कार्यात सहभागी का झालो नाही आणि त्यांच्यासाठी तरी आम्ही सहभागी व्हावे म्हणून ते जोरात टाळ्यांचा कडकडाट करीत होते! कोणीतरी माझ्या राजकीय विचारांबद्दल मला छेडले देखील आणि त्याने मी बधतो की काय हे पहाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या दुर्दैवाने त्याचा काही उपयोग झाला नाही. 'थाली बजाओ' किंवा 'दिया जलाओ' असो, हे उपक्रम सोशल मीडियावर लगेचच्या लगेच त्याचे फोटो/ व्हिडिओ टाकून साजरे करण्यासाठीच होते असं आपलं माझं झालं.या उपक्रमांचं कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठीचे यशापयश सर्वांसमोर आहेच!
लॉक डाऊनच्या नव्या नवलाईचे पहिले काही दिवस होते,त्यात बाबा लोक्स घरी होते. म्हणून त्यांना घरातील कामात मदत करावी लागली. आमच्या वरच्या घरात अशा एका प्रेमळ वडिलांवर त्यांच्या गोड लहान मुलासाठी नाश्ता देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असावी. ते दररोज प्रेमाने आर्जवं करतानाचा आवाज ऐकू येई -"लाडू फिनिश कर ...". मला आश्चर्य वाटायचं की त्यांचा मुलगा इतका आज्ञाधारक कसा की तो नाश्त्याला दररोज गपगुमान फक्त लाडूच खातो ?! नंतर मला कळलं की लाडू हा नाश्त्याचा प्रकार नसून ते आपल्या मुलाला लाडाने लाडू म्हणत असे! कारण एकदा ते म्हणाल्याचं ऐकू आलं - "ए लाडू .... असं नको करू... ती मॅगी संपव ना बाळा!"
या पहिल्या काही दिवसांतच घराघरातून भांडी पडण्याचा आवाज आला. म्हणजे असं नाही की कोणी वाद घालत होतं. घरी कामवाल्या बायका येऊ न शकल्यामुळे नवऱ्यांना भांडी घासण्याचं काम पडल्यामुळे हे आवाज येत होते. आता त्यांना हे काम करण्याची सवय नव्हती की काम अनिच्छेने केले जात होते म्हणून भांडी पडण्याचाआवाज खूप जास्त येत होता हे कळायला मार्ग नव्हता!
लॉक डाऊन च्या काळात घरी बसून काय करायचे हा प्रश्न आमच्या शेजार्यांनी आमच्यासाठी सोडवून टाकला - ते टीव्हीवर सतत मोठ्या आवाजात बातम्यांचे चॅनेल लावून त्यांच्या घराचं दार उघडं ठेऊन महान सामाजिक कार्य करीत होते! बातम्यांमध्ये तरी नावीन्य असावे ना! त्याच त्या बातमी वेगवेगळ्या वाहिन्यांवर (कधीकधी फक्त भाषा बदलून)ऐकू येत होत्या."अमक्या शहरात कोरोनाचा कहर" "अमक्या ठिकाणी अनेक संशयास्पद रुग्ण सापडले"(जणू काही ते रुग्ण गुन्हेगारच आहेत!)
लोकांना लॉक डाऊनची थोडीशी सवय होताच भांड्याला भांडं लागण्याचेही आवाज ऐकू येऊ लागले! छोट्या छोट्या कारणांमुळेही धुसफूस वाढून त्याचे पर्यावसन भांडणात होऊ लागलं.आता हेच बघा ना! आमच्या पुण्यासह इतर शहरांमध्येही बहुतेक घरांमध्ये रविवारी(विशेषतः संध्याकाळी) चूल पेटत नाही! हा एक अलिखित नियमच आहे म्हणा ना ! आमचे एक शेजारी देखील पिढ्यानपिढ्या दर रविवारी पाव भाजी खायला हॉटेलात जातात. लॉकडाऊन दरम्यान हॉटेल्स पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या शेजाऱ्यांसारख्या अनेक लोकांची पूर्णपणे गळचेपीच झाली ना ! करावं तरी काय!नंतर सरकारने घरी पार्सलने बाहेरचे खाणे आणण्याची मुभा देण्याचे एक चांगले काम केलं. पण जर असं पार्सल मागवण्यातून कोरोनाचा धोका निर्माण झाला तर? ज्याने तो आणला त्याला कोरोना असेल तर? एकीकडे हॉटेलमध्ये जाऊ न शकल्याने गंभीर पेच आणि दुसरीकडे हा धोका! आमच्या या शेजाऱ्याने हा धोका पत्करला.त्याची आई मात्र तार सप्तकात त्याला सतत सूचना देऊन त्याला बाहेर जाऊ नको असं सांगत होती.आईच्या त्या सूचनांना अव्हेरून मुलाने पावभाजीच्या पार्सलची ऑर्डर दिलीच. मुलगा गाडीवरून पावभाजी आणायला निघेपर्यंत आईचे प्रयत्न चालूच होते. मुलगा एक इंच मागे हटायला तयार नव्हता. कारण त्याला सबळ पाठिंबा त्याच्या बायकोचा होता. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुनेचा थोडासुद्धा आवाज येत नव्हता. ती फक्त गॅलरीत येऊन उभी राहिली होती. प्रतिष्ठेचा प्रश्न मुलाच्या आईसाठी होता. शेवटी गाडीला किक मारून तो मुलगा पाव भाजी आणायला गेला की नाही is anybody's guess!
या लॉक डाऊनच्या काळात बीएसएनएल आणि इतर खासगी कंपन्या तसेच महावितरणचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे ! इंटरनेट आणि विजेची मागणी अफाट वाढून देखील त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी समाधानकारक सेवा दिली आहे. लोक फक्त WFH च करत आहेत म्हणून ही मागणी वाढली आहे असं नाही. मध्यंतरी अचानक सगळीकडे एक वेबीनारचं पेव फुटलं. वेगवेगळ्या विषयांवर हे वेबिनार झाले. मी सुद्धा असे काही अटेंड केले. ऐन दुपारच्या वेळी एखाद्या कंटाळवाण्या विषयावर एखादा वक्ता जीव तोडून बोलत असला तर झोप टाळणे ही एक कसरतच असते. वेबिनार बरोबरच आणखी एक प्रकार सध्या दिसून येतो- Google Duo, Zoom किंवा Whatsapp कॉल द्वारे मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी! सध्या प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे या आधुनिक टेक्नॉलॉजी च्या आधारे ती कसर भरून निघत आहे! मग "हा........ य ...... हॅ...... .... लो ... किती दिवसांनी भेटतोय ना आपण ..... हा हा हि ही ....." हे आवाज येऊ लागले! या भेटींतून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारताची सामरिक व्यूहरचना, देशाची आर्थिक परिस्थिती इथपासून ते अगदी नुकताच केलेल्या आणि सोशल मीडिया वर पोस्ट केलेल्या एखाद्या नावीन्यपूर्ण पदार्थाची पाककृती अशा अनेक विषयांवर चर्चा रंगल्या! सध्या मात्र शाळा चालू झाल्यापासून आमच्या समोरच्या घरी ऑनलाईन शाळा चालू आहे. हा मुलगा त्याच्या शिक्षिकेचं लक्ष वेधून घेण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे - "मॅम... मॅम .... which colour book? yellow colour?" हे एकच वाक्य निदान १५-२० वेळा त्याने म्हटलं असेल...
जसे जसे दिवस सरकू लागले तसं सगळ्यांच्या लक्षात आलं की हा कोरोना काही मागे हटत नाही. दिवस-रात्र, वेळी-अवेळी ऍम्ब्युलन्सचे आवाज मात्र वाढू लागले. ठिकठिकाणी पेशंटची संख्या वाढू लागली. बाहेर काहीही झालं तरी इथे आपण सुरक्षित आहोत ही भावना हळू हळू लोप पावत चालली. दबक्या पावलांनी कोरोनाने आमच्या सोसायटीत प्रवेश केला आणि दबक्या आवाजात लोकांचं बोलणं सुरु झालं - "तुमच्या बिल्डिंग मध्ये राहतो ना तो ... तो पॉझिटिव्ह निघाला! (जसं काही यांनी रिपोर्ट पाहिलाच आहे !)तुला कळलं नाही? जपून राहा जरा !" आणि मग घरोघरी देवाची गाणी ऐकू येऊ लागली. बायका स्वयंपाक करताना देखील मोबाईल समोर ठेवून त्यावर देवाचे स्तोत्र -मंत्र ऐकू लागल्या. सध्या देवळं बंद असल्यामुळे आमच्या समोरच्यांनी (जे देवळाचे विश्वस्त आहेत) देवाची छोटी मूर्ती घरी आणली. मग सकाळ संध्याकाळ ठराविक वेळेला साग्रसंगीत(आणि अर्थातच मोठ्या आवाजात)आरती सुरु झाली. हळूहळू आता त्या आरतीच्या वेळी त्यांच्याकडे गर्दी वाढू लागली आहे.
या सगळ्या कोलाहलात मला काही चांगले आवाज ऐकू आले हे आवर्जून सांगितलं पाहिजे. शिक्रा, Fantail Flycatcher, Tickel's blue Flycatcher, Spotted Owlet या सारख्या कितीतरी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज मला ऐकायला मिळाले. दयाळ (Magpie Robin), खंड्या (White throated Kingfisher) आणि कोकीळ यांचे तर कॉल ऐकून मीच कंटाळून गेलो! कितीतरी पक्षी जे या आधी मी आमच्या भागात बघितले नव्हते ते बघायला मिळाले(उदा - Scaly breasted Munia).
मी संध्याकाळी फिरायला जात असताना नेहमी मला एक चौकोनी कुटुंब दिसतं. आई-वडील आणि त्यांची शाळकरी मुलं असे चौघेजण मिळून बॅडमिंटन खेळतात. बॅडमिंटन खेळापेक्षा त्यांचं हसणं-खिदळणं, दंगा -मस्ती, रुसवे-फुगवे हे बघायला मजा येते. हे family bonding खूप छान वाटतं.
असाच फिरत असताना आमच्या बिल्डिंगमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका घरातून कोणीतरी गिटार वाजवत असल्याचा आवाज ऐकून मी थबकलोच! गिटारबरोबरच एक तरुण मुलगा गातही होता. त्याला मी आवाजावरून ओळखलं. हा तर एक टग्या मुलगा होता. पण तोच आता गिटार वाजवतो आणि गातोसुद्धा? नंतर लक्षात आलं की तो नवविवाहित होता आणि त्याची बायको गिटार वाजवत होती. सध्याच्या या अनिश्चित काळात या नवपरिणीत जोडप्याचं स्थळ काळाचं भान विसरून Live as if there is no tomorrow अशा प्रकारे गाणं बजावणं मला मनापासून आवडलं !