संध्याकाळची वेळ . . हुरहूर लावणारी . . . दिवस कसातरी कामाच्या व्यापात गेल्यावर येते ती संध्याकाळ ! गुलाम अली-आशा भोसले यांच्या गझल मधले काही शब्द उसने घेतले तर-
दिन भर तो मैं दुनिया के धंदो में खोया रहा
दिन भर तो मैं दुनिया के धंदो में खोया रहा
जब दीवारो से धूप ढली . . .
तुम याद आये . . तुम याद आये ।
तर अशा व्याकूळ आठवणींची ती संध्याकाळ ! विरह, एकटेपणा, प्रेमभंग, नैराश्य, नात्यांमधले गैरसमज या सगळ्यामुळे विचारात बुडायला लावणाऱ्या संध्याकाळी साथ देते मदिरा आणि मग त्या दु :खाला आणखी गहिरेपण प्राप्त होते. हिंदी सिनेमात असे प्रसंग अनेक वेळा दाखवण्यात येतात. अनेक गायकांनी अशी गाणी गायली आहेत. पण यातच आणखी थोडी वर्गवारी केली तर? मोहम्मद रफी यांनी गायलेली, संध्याकाळ -रात्र या समयातील, तिची आठवण आणि त्याने होणारा त्रास हा विषय असलेली ही तीन गाणी आहेत. या गाण्यात आणखी एक सांगीतिक समान धागा आहे-जो तुम्ही ओळखायचा आहे! माझ्या आवडीप्रमाणे मी यांचा क्रम लावला आहे. तो तुम्हाला मान्य असेलच असे नाही.
१) हुई शाम उनका खयाल आ गया- चित्रपट मेरे हमदम मेरे दोस्त
संगीतकार लक्ष्मीकांत -प्यारेलाल जोडीच्या कुठल्याही १० सर्वोत्तम गाण्यांमध्ये हे गाणे यावं अशा पात्रतेचं हे गाणं. मी तर पुढे जाउन म्हणेन की त्यांनी जर फक्त हे एकच गाणे केले असते तरी ते महान संगीतकार ठरले असते. या गाण्यात 'सवाल' ''मलाल' 'चाल' या शब्दांवर मोहम्मद रफींनी अशी काही करामत केली आहे की बस्स! मजरूह सुलतानपुरी यांची ही गझल मनाला खोल जाउन भिडते. त्यामुळे या गाण्यातला तो तकलुपी सेट, फर्निचरची भीषण रंगसंगती काही खटकत नाही.
२) है दुनिया उसीकी जमाना उसीका -चित्रपट काश्मीर की कली
या सिनेमातल्या इतर हलक्याफुलक्या,उडत्या ठेक्याच्या गाण्यांमध्ये देखील हे गाणे आपली वेगळी छाप पाडून जातं. ओ. पी. नय्यर यांच्या टिपिकल टांगा ह्रिदम पेक्षा संपूर्णपणे वेगळं असं हे गाणं. शम्मीकपूरला रफीचा आवाज का suit व्हायचा याच्या कितीतरी खुणा या गाण्यात दिसतील.
https://youtu.be/WO_aMRsEIIY
https://youtu.be/WO_aMRsEIIY
३) दिन ढाल जाये रात न जाये- चित्रपट गाईड
या एस डी च्या गाण्यातील पहिले काही शब्द त्याच चालीत त्यांचा सुपुत्र आर डी यांना 'किनारा' चित्रपटातील 'अब के ना सावन बरसे' यात वापरावेसे वाटले म्हणजे या मूळ गाण्याचे माहात्म्य लक्षात यावे. यात interlude मधल्या काही तुकड्यांमध्ये वीणा वापरलंय की ती गिटार आहे ?
https://youtu.be/HrbzfLFj6Es
https://youtu.be/HrbzfLFj6Es
(Disclaimer : एक डॉक्टर या नात्याने मला हे सांगावेसे वाटते की ही गाणी पोस्ट करून किंवा त्याबद्दल लिहून मी कुठल्याही प्रकारे दारू पिण्याचे समर्थन किंवा उदात्तीकरण करू इच्छित नाही !)
(जर तुम्हांला या तिन्ही गाण्यांचा सांगीतिक समान धागा लक्षात आला नसेल आणि तो जाणून घेण्याची इच्छा असेल तर- या तिन्ही गाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात सॅक्सोफोनचा वापर करण्यात आला आहे)
(जर तुम्हांला या तिन्ही गाण्यांचा सांगीतिक समान धागा लक्षात आला नसेल आणि तो जाणून घेण्याची इच्छा असेल तर- या तिन्ही गाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात सॅक्सोफोनचा वापर करण्यात आला आहे)
6 comments:
मस्तच रे मित्रा
सुंदर...
रफीबद्दल पुष्कळ लिहीलं गेलं आहे पण गाण्यांबद्दल वाचताना कधीच कंटाळा येत का नाही याचं कारण मला कधीच सापडलं नाही ... आणि त्याने मी कधीच बेचैन पण होत नाही कारण मला स्वतःला असली 'विवरणं' वाचायला आवडतांत...(कुणी चावायला का म्हणेना...म्हणोत बापडे...क्या फर्क पडता है ? आय जस्ट एन्जॉय इट...)
तुझ्याएवढा माझा रफीच्या गाण्यांबद्दल होमवर्क नाहीये पण इथे आजच्या दिवशी (एकतीस सात) त्याची गरज पण नाहीये...ज्याने कोणी रफीचं अगदी कमी श्रेणीचं का होईना पण एखादं गाणं जरी ऐकलं तरी त्यातली 'खोली' (depth) आणि 'आवाका' (range) लक्षांत आल्याशिवाय रहात नाही. लताबाई म्हणतांत तशी 'Quality of voice' अगदी उच्च कोटीची होती...या दोन गायकांचा श्वास गाण्यांत कुठेही ऐकायला येत नाही (आणि लक्षांत घ्यायला हवं की हे लोक त्या काळांत अगदी आपल्या करियरच्या शिखरावर होते जेव्हा कम्प्युटर सॉफ्टवेअर वगैरे आजच्याइतके (२०१९) प्रगत नव्हते...जिथे गायकांच्या चुका, श्वास, घसरलेले स्वर, चुकलेले ठेके (आणि ठोके) सहज कम्प्युटरवर दुरुस्त केले जाऊ शकतात...(कदाचित म्हणूनच जुन्या गाण्यांना चिरंजीवीत्व लाभलं असावं)...
स्कॉटलंड मध्ये दोन दोनशे वर्षं जुनी दारू पिपात भरून साठवून ठेवली आहे म्हणतात...(आणि तिला प्रचंड मागणी असते… आणि ती पाण्यासारखी पिण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायची लोकांची तयारी असते )...आणि इथे काल आणलेली स्प्राईटची बाटली समजा फ्रिज मध्ये ठेवायची राहिली तर त्या स्प्राईट ची ताडी होऊन जाते...:) :)... मला म्हणायचंय ज्या गाण्यांत कुठला दोष राहिलाच नाहीये ते कायम टिकणारच ना???...जशी ती दारू बनवताना अगदी काटेकोरपणे बनवली गेली...दुरुस्त करत करत बनवलेलं स्प्राईट मात्रं 'टिकणार' नाहीच...असो...
बऱ्याचदा असं घडलंय की रफीची पुष्कळ गाणी अगदी सुपरहिट आहेत रेडियोवर वगैरे सारखी लागत असतात पण कधी कंटाळा येत नाही ऐकायला...पण तीच गाणी 'बघितली' की रफीबद्दलचा आदर दुणावतो...कसल्या एक एक अभिनयशून्य नायकांना रफीने आवाज दिला आहे...इथे कोणाबद्द्ल अनादर करायचा नाहीये पण रफीची महानता या वास्तवामुळे नि:संशय पणे अधोरेखित होते.
गाईड च्या संपूर्ण संगीताचे संगीत संयोजन मनोहारी सिंग यांनी केले होते असं वाचलंय आणि पुण्यात एका कार्यक्रमांत ऐकलंय...
तू दिलेली गाणी पुन्हा एकदा ऐकणार / पाहणार आहेच. धन्यवाद.
धन्यवाद संजीव!
काय म्हणू श्रीपाद!? तुझी कॉमेंट एखाद्या स्वतंत्र ब्लॉगपेक्षाही अप्रतिम आहे. त्यातून तुझी रसिकता तर दिसतेच शिवाय तुझं अफाट ज्ञान आणि स्मरणशक्तीही कळते! शिवाय तुझी दादही भरभरून असते त्यामुळे लिहायचा उत्साह आणखी वाढतो. पुन्हा एकदा आभार!
Disclaimer आवडलं! Jokes apart, ही गाणी खरंच सुंदर आहेत! Esp "दीन ढल जाये" one of my favourites... रफीच्या आवाजात दर्द खूप छान होता सो sad/विरह गीतं उत्तम गायली आहेत... अर्थात मी हे सांगायला नको... मी काही एक्स्पर्ट वैगरे नाही... एक श्रोती!
वर श्रीपाद नी लिहिल्या प्रमाणे रफी बद्दल खूप काही लिहिलं आहेच बऱ्याच जणांनी आणि त्यांनी स्वतः सुद्धा छान describe केलं आहे रफी ला आणि त्याच्या गाण्याला!
खूप सुंदर लिहिले आहे
एक गाणे add करावेसे वाटते
महफिल se उठ जाने walo तुम लोगो पर क्या iljaam
Film Duj का चांद
Sahir Ludhiyanvi
Roshan
Post a Comment