('पर्याय' च्या २०१३ च्या वृद्धत्व विशेषांकातला हा माझा तिसरा लेख)
सांसारिक जबाबदार्या पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे स्वत:च्या आधी पूर्ण न होऊ शकलेल्या इच्छा पूर्ण करण्याकडे माणसाचा कल असतो. काहीजण एखादा छंद जोपासतात, कुणीतरी परदेश वार्या करतात, काहीजण मुलं, नातवंडं यांच्यात रमतात तर काही ज्येष्ठ नागरिक संघात सहभागी होऊन त्यातील वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेतात. परंतु यापलिकडे विचार करून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने प्रेरित होऊन एक समजोपयोगी संस्था शून्यातून उभी करणारे तसे विरळाच! अशाच एका ध्यासाचा, लीना देवस्थळी यांनी जांभूळपाडा येथे उभ्या केलेल्या ‘चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास’ चा हा वेध!

सध्याच्या सामाजिक परिस्थितीतच वृद्धाश्रम का काढावा याची कारणे सामावलेली आहेत. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गात आर्थिक स्थैर्य आलेले आहे. बहुतेक नोकरदार वर्गाला निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधाही आहे. परंतु याचबरोबर कुटुंबाचा आकार लहान होत आहे. तसेच जागतिकीकरणामुळे मुलांना नोकरीच्या संधी जगभरांत कुठेही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. कित्येक घरात मुलगा-सून परदेशात, आणि आई-वडील भारतात असे चित्र दिसते. काही कुटुंबात आई-वडील, मुलं एकत्र राहातात, पण मुलं-सुना एकमेकांना सुद्धा वेळ देऊ शकत नाहीत. वैद्यकीय सुविधा-सोयी यामुळे आयुर्मान वाढू लागले आहे. साहजिकच वृद्धांची संख्याही वाढू लागली आहे. त्यातच जोडीदाराचा मृत्यू झाल्यास आणखीनच एकटेपणा जाणवतो. आर्थिक सुबत्ता आहे, पण काळजी घेण्यास कोणी नाही, विरंगुळा वाटेल असे घरात टी.व्ही.शिवाय काही नाही, बोलायला कोणी नाही, असे काहीसे निराशाजनक चित्रही बर्याचदा दिसते. काहीवेळा, विशेषतः आजारी लोकांसाठी, नर्सिंग ब्युरोमधून कामासाठी स्टाफ ठेवण्यात येतो. परंतु मदतीला येणार्या व्यक्तीच्या हजेरीत सातत्य राहतेच असे नाही. घरी एक-एकटेच वृद्ध किंवा दांपत्य राहात असल्यास सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वृद्धाश्रम ही सध्याची गरज आहे असं जरी म्हटलं तरी प्रत्यक्षात वृद्धाश्रमांचे चित्र फारसे समाधानकारक नाही. जिथे चांगल्या सोई आहेत, तिथे खूप पैसे द्यावे लागतात तर काही ठिकाणी पैसे देऊनही हालाखीच्या परिस्थितीत वृद्धांना राहावे लागते. सर्वच क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे. वृद्धांना स्वतंत्रपणे, सन्मानाने राहता यावे, तसेच समवयस्कांच्या संगतीत राहून आयुष्याच्या संध्याकाळचा काळ शांततेत आणि समाधानात घालवता यावा, आवश्यक त्या सोई-सुविधा असाव्यात आणि तरीही हे सगळे बर्याच अंशी परवडू शकेल अशा दरात असावे, या उद्देशाने लीना देवस्थळी यांनी वृद्धाश्रम काढायचे ठरवले.
लीना देवस्थळी |
अर्थात हा विचार आल्यानंतर तो कृतीत येईपर्यंतचा प्रवास निश्चितच खडतर आणि असंख्य अडचणींच्या शर्यतींचा होता. वृद्धाश्रम शहरात चालविणे तसे सोपे गेले असते. पण विशेषत: मुंबईसारख्या ठिकाणी जागांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना हा विचारही आवाक्याबाहेरचा होता. म्हणून पुण्या-मुंबईपासून जाण्यासाठी सोयीची असेल अशा जागेचा शोध सुरू झाला. 2007 मध्ये लीना देवस्थळींनी जागा शोधायला सुरुवात केली. बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, टिटवाळा या पट्ट्यांत अनेक जागा पाहिल्या. पण काही ठिकाणी जागा वस्तीपासून दूर होत्या तर काही ठिकाणी रस्ते खराब होते, तर काही ठिकाणी clear title नव्हते. अशा प्रकारे प्लॉटची जागा शोधण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव! आणि गाठ पडे ती स्थानिक, इतर काही रोजगार नसल्यामुळे जागा खरेदी-विक्रीचा चलनी व्यवसाय करणार्या तरुणांशी! काही वेळा ते त्या जागेच्या मालकांबाबत, टायटल, सातबाराचा उतारा याबाबत काहीच बोलत नसत. केवळ लीना देवस्थळींकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असत. ‘‘तुम्ही काही काळजी करू नका. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सगळं व्यवस्थित करून देऊ’’ असे नुसते म्हणत. जागेचा व्यवहार पुरुष व्यक्ती बरोबर असल्याशिवाय, बायका करतील असे त्या लोकांना वाटतच नसे. एकाने तर सरळच विचारले देखील- ‘‘तुमच्याशी बोलणं झालं, ठीक आहे. पण व्यवहार कोणाशी करायचा? तुमच्याबरोबर पुरुष माणूस कधी येईल?’’
जागेचा शोध एकीकडे चालू असताना दुसरीकडे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली. मथुरा फाउंडेशन हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. विविध वृद्धाश्रमांना भेटी देऊन, तिथली कार्यप्रणाली समजून घेऊन ‘चैतन्य’ची नियमावली ठरविण्यात आली.
2009 मध्ये, म्हणजेच सुमारे 2 वर्षांनंतर जांभुळपाडा (खोपोली-पाली रस्त्यावरील एक गाव) गावठाणात असलेली एक जागा पसंत पडली.
पुण्या-मुंबईपासून एस.टी.ने जोडलेलं, (दोन्हीकडून सुमारे 100 कि.मी.वर असलेलं ) नदीकाठचं शांत गाव, गावात असलेली अनेक मंदिरं, तसेच जागेजवळ असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एस. टी.चा थांबा या सर्व बाबींचा विचार करून ही सुमारे पाऊण एकर जागा वृद्धाश्रमासाठी निश्चित करण्यात आली. जवळपास म्हणजे खुद्द जांभुळपाडयातच ‘आनंदधाम’ आणि तीन किलोमीटरवर कानसळ येथे ‘स्नेहबंधन’ असे आणखी दोन वृद्धाश्रम अनेक वर्षे आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि सहकार्याचा ‘चैतन्य’च्या उभारणीपासून आतापर्यंत वेळोवेळी खूपच फायदा झाल्याचे लीना देवस्थळी आवर्जून नमूद करतात.

जागा निश्चित झाल्यावर ‘चैतन्य’च्या प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू झाला. जागेची मोजणी होऊन स्थानिक सरपंचाची परवानगी मिळवणं, टेंडर मागवणं व आडगावात चांगलं काम करू शकेल असा contractor शोधणे हे तसं जिकिरीचं होतं . सर्व गोष्टीत खूप वेळ गेल्यामुळे जागेच्या किंमतीसकट तिथे इमारत बांधण्याच्या खर्चातही प्रचंड वाढ झाली. मुंबंईपासून लांब असल्यामुळे सर्व बाबतीत वाहतुकीचा खर्च वाढला. मजुरीसाठी स्थानिक मजूर उपलब्ध न झाल्यामुळे तोही खर्च वाढला. सर्व समस्यांवर मात करत हळूहळू ‘चैतन्य’चे मूर्त रूप दिसू लागले. आडारकर असोसिएटचे भागीदार आर्किटेट श्री. काळे व नीरा आडारकर यांनी पाऊण एकर जागेचा पुरेपूर वापर करत इमारतीची संकल्पना अशा प्रकारे केली की ज्यायोगे तिथे एखाद्या बैठ्या वाड्यासारखा अनुभव यावा.
प्रवेश करताच खूप उंच लॉबी, मध्यभागी चाफ्याची झाडं असलेली मोकळी जागा आणि त्याभोवती निवासींसाठी 15 खोल्या अतिथींसाठी खोल्या, विश्वस्तांच्या खोल्या, मनोरंजन कक्ष, ग्रंथालय, भोजनगृह, स्वयंपाकगृह, अटेंडंट व सुपरवायझर यांच्या खोल्या, ऑफीस एवढं सगळं असूनही इमारतीला एक मोकळा सुटसुटीतपणा आहे. निवासींना आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे ही सुरक्षिततेची भावना वाटावी, पण तरीही त्यांचे स्वातंत्र्य जपले जावे अशी एकूण रचना आहे. तसेच इमारतीच्या मधोमध landscape gardening केल्यामुळे एक छान प्रसन्नता वाटते.

निवासींच्या खोल्यांमध्ये आणि एकूणच इमारतीत वृद्ध लोकांचा विचार करून अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इथे कुठेही उंबरठा नाही. सगळे passages आच्छादित आहेत; जेणेकरून चालता-फिरताना उन्हा-पावसाचा त्रास होत नाही. प्रत्येक खोलीत दोन माणसांची राहण्याची सोय आहे.
प्रत्येक खोलीला जोडून संडास-बाथरूम आहेत शिवाय वेगळे बेसिन आहे. प्रत्येक खोलीत 2 कॉट, 2 कपाटं, 1 टेबल, 2 खुर्च्या असे फर्निचर आहे. खोल्यांच्या बाहेर छोटा व्हरांडा आहे जिथे बसण्यासाठी कट्टाही आहे. संडास-बाथरूमच्या दारांना कुलुपंही वैशिष्ट्यपूर्ण आहेत- ज्यामुळे माणूस आत अडकला तरीही दार न तोडता बाहेरून दार उघडता येऊ शकते. काही खोल्यांमध्ये संडास-बाथरूममध्ये ramp आहे; ज्यायोगे तिथे wheel chair नेता येऊ शकते. इथे विरंगुळ्यासाठी पुस्तकांची सुसज्ज लायब्ररी आहे. मनोरंजन कक्षात टी.व्ही. आहे, कॅरम, पत्ते, बुद्धिबळ खेळण्याची सोय आहे. भोजनकक्षात 30-35 जण एकत्र जेवू शकतील एवढी जागा आहे.

2009 साली बांधकामाला सुरुवात केल्यानंतर 2012 च्या गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर ‘चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास’चे उद्घाटन करण्यात आले. एका विशिष्ट ध्येयाने चालू केलेले काम पूर्ण झाल्याचे आणि तेही अपेक्षा होती तशाच प्रकारे झाल्याचे समाधान लीना देवस्थळींना मिळाले.
‘चैतन्य’बद्दलची माहिती काही वृत्तपत्रात आली तसेच mouth publicity द्वारे अनेकांना ‘चैतन्य’बद्दल माहिती मिळू लागली व तिथली घडी बसू लागली. इथे कायमस्वरूपी राहू इच्छिणार्यांची लीना देवस्थळी आधी मुलाखत घेतात. त्यानंतर एक महिना temporary बेसिसवर विशिष्ट रक्कम भरून राहू शकतात. जर दोन्ही बाजूंनी कोणाला काही अडचण वाटली नाही तरच निवासी पुढे राहू शकतात. यासाठी काही रक्कम बिनव्याजी deposit म्हणून घेण्यात येते. त्यानंतर प्रत्येक महिन्याची फी निवासींना भरावी लागते. यामध्ये दोन वेळा चहा, एक वेळ दूध, दोन वेळेचा नाश्ता (संध्याकाळचा कोरडा नाश्ता, सकाळचा गरम नाश्ता), दोन वेळचं जेवण (दही-ताकासह) तसेच रविवारी मिष्टान्न याचा समावेश आहे. ज्याप्रमाणात सोई-सुविधा इथे उपलब्ध आहेत, त्यामानाने इथला खर्च वाजवी आणि परवडण्या एवढा आहे. तसेच ज्यांना काही दिवसांसाठी राहायचे आहे किंवा दिवाळीच्या काळांत फटाक्यांच्या आवाजापासून लांब राहायचे आहे किंवा एक बदल म्हणून इथे यायचे आहे त्यांना दिवसाच्या भाड्याप्रमाणे इथे राहाणे शक्य आहे. इथे राहण्यासाठी वयाची अट तशी नाही. वय-वर्षे 55च्या पुढचे कोणीही, जे हिंडते-फिरते आहेत ते इथे राहू शकतात. ज्यांना स्वत:साठी मदतीची गरज लागते अशांची सोय इथे होऊ शकत नाही कारण तशा प्रकारची इथली रचनाही नाही. तसेच हे hospice नाही. म्हणजेच ज्यांना असाध्य आजार आहे किंवा जे अंथरुणाला खिळलेले आहेत अशा लोकांची इथे सोय होऊ शकत नाही. मात्र इथे राहणार्या लोकांसाठी मासिक वैद्यकीय तपासणीची व्यवस्था आहे. तसेच दवाखान्यात/इस्पितळात दाखल करण्याची वेळ आल्यासambulance ची सोय आहे.
गेलं दीड वर्ष ‘चैतन्य’ चालविताना माणसांच्या स्वभावाचे आणि वयोमानामुळे व्यक्तीवर झालेल्या परिणामांचे अनुभव सौ. देवस्थळींना आले. एखादी व्यक्ती जरी ‘चैतन्य’मध्ये राहायला आली तरी ती तिचा मूळ स्वभाव बरोबर घेऊनच येत असते. त्यामुळे निवासींना काही वेळा इथेही इतरांशी जुळवून घेतांना समस्या येतात. काही वेळा मात्र असेही झाले की परिस्थितीच इतकी विचित्र होती की त्यात अपरिहार्यपणे कटू निर्णय घेणे भाग पडले. एक 80 वर्षांच्या आजी काही काळापासून राहत होत्या. इथल्या सगळ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या आजींनी त्यांच्या इथल्या राहण्याबद्दल एक छान कविताही केली होती. परंतु त्या आजारी पडल्या आणि त्यामुळे त्या स्वतंत्रपणे काही करू शकत नव्हत्या. त्यांना मदतीची गरज होती. ‘चैतन्य’च्या नियमांप्रमाणे अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या घरी पाठवणे हाच मार्ग होता. परंतु अशा अवस्थेत त्यांना 'इथून जा' असं सांगणं सुद्धा अवघड होतं. असं सांगून आपण काही क्रूरपणे तर वागत नाही ना असंही सौ. देवस्थळींना वाटून गेलं. खरं तर आजींच्या दृष्टीने अशा वेळीच त्यांना आधाराची गरज होती. त्यातच त्यांचा मुलगा त्यांना परत नेण्यास तयार होईना. कसं तरी मुलाला पटवून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं. तिथे उपचार घेतल्यानंतर 8-10 दिवसांत मुलाने त्यांना पुन्हा इथे आणून सोडलं . त्यांची प्रकृती फार काही सुधारली नव्हती. दारापासून ते खोलीपर्यंत त्या चालूही शकत नव्हत्या. मग इथल्या नियमांना अपवाद करत त्यांच्यासाठी एका नर्सची व्यवस्था करण्यात आली. यातील पुढची विशेष गोष्ट म्हणजे आपल्यामुळे आपल्या मुलावर जास्तीच्या खर्चाचा बोजा पडतोय या भावनेने त्या संकोचून गेल्या आणि त्या नर्सला काढून टाका असे म्हणू लागल्या. पण त्यांची प्रकृती सुधारत नसल्यामुळे नाइलाजास्तव त्यांना पुन्हा घरी पाठवणे भाग पडले.
‘चैतन्य’मधील एकूणच वातावरण खेळीमेळीचे आहे. एकमेकांना मदत करण्यास सगळे तत्पर असतात. होळी, पाडवा, गणपती, नवरात्र, कोजागिरी असे सगळे छोटे-मोठे सण आणि प्रत्येक निवासी व सेवकांचे वाढदिवस इथे उत्साहात साजरे केले जातात. 2012 मध्ये इथली पहिलीच दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. निवासींनी आपले अगदी ठेवणीतले नवे कपडे घातले होते. रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील यामुळे दिवाळीचा प्रसन्न माहोल होता. यावर कडी म्हणजे दिवाळीचा फराळ! इथलं वातावरण इतकं छान ठेवण्यात महत्त्वाचा वाटा सेवक-सेविकांचा आहे, असे सौ. देवस्थळी सांगतात. नेहमी हसतमुखाने, प्रेमाने आणि अगदी घरच्या आपुलकीने इथला स्टाफ काम करतो. एक निवासी महिला काही कामानिमित्त त्यांच्या घरी जायला निघाल्या होत्या तेव्हा त्यांच्या हातातून त्यांची bag घेऊन, एक सेविका आस्थेने एस.टी.पर्यंत सोडायला गेल्या तर बाकीचे सगळे निरोप द्यायला दारापर्यंत आले होते. त्या निवासी स्त्रीला अगदी भरून आले. त्या निवासी म्हणाल्या, ‘‘आजपर्यंत असं मला निरोप द्यायला कोणीच आलं नव्हतं.’’ हा अनुभव इथल्या वातावरणबद्दल बरंच कांही सांगून जातो!
आपला वृद्धाश्रम म्हणजे असंच ‘आनंदाचं बेट’ राहावं अशी इच्छा सौ. देवस्थळी व्यक्त करतात!
(www.chaitanyasahniwas.com)
No comments:
Post a Comment