संध्याकाळची वेळ . . हुरहूर लावणारी . . . दिवस कसातरी कामाच्या व्यापात गेल्यावर येते ती संध्याकाळ ! गुलाम अली-आशा भोसले यांच्या गझल मधले काही शब्द उसने घेतले तर-
दिन भर तो मैं दुनिया के धंदो में खोया रहा
दिन भर तो मैं दुनिया के धंदो में खोया रहा
जब दीवारो से धूप ढली . . .
तुम याद आये . . तुम याद आये ।
तर अशा व्याकूळ आठवणींची ती संध्याकाळ ! विरह, एकटेपणा, प्रेमभंग, नैराश्य, नात्यांमधले गैरसमज या सगळ्यामुळे विचारात बुडायला लावणाऱ्या संध्याकाळी साथ देते मदिरा आणि मग त्या दु :खाला आणखी गहिरेपण प्राप्त होते. हिंदी सिनेमात असे प्रसंग अनेक वेळा दाखवण्यात येतात. अनेक गायकांनी अशी गाणी गायली आहेत. पण यातच आणखी थोडी वर्गवारी केली तर? मोहम्मद रफी यांनी गायलेली, संध्याकाळ -रात्र या समयातील, तिची आठवण आणि त्याने होणारा त्रास हा विषय असलेली ही तीन गाणी आहेत. या गाण्यात आणखी एक सांगीतिक समान धागा आहे-जो तुम्ही ओळखायचा आहे! माझ्या आवडीप्रमाणे मी यांचा क्रम लावला आहे. तो तुम्हाला मान्य असेलच असे नाही.
१) हुई शाम उनका खयाल आ गया- चित्रपट मेरे हमदम मेरे दोस्त
संगीतकार लक्ष्मीकांत -प्यारेलाल जोडीच्या कुठल्याही १० सर्वोत्तम गाण्यांमध्ये हे गाणे यावं अशा पात्रतेचं हे गाणं. मी तर पुढे जाउन म्हणेन की त्यांनी जर फक्त हे एकच गाणे केले असते तरी ते महान संगीतकार ठरले असते. या गाण्यात 'सवाल' ''मलाल' 'चाल' या शब्दांवर मोहम्मद रफींनी अशी काही करामत केली आहे की बस्स! मजरूह सुलतानपुरी यांची ही गझल मनाला खोल जाउन भिडते. त्यामुळे या गाण्यातला तो तकलुपी सेट, फर्निचरची भीषण रंगसंगती काही खटकत नाही.
२) है दुनिया उसीकी जमाना उसीका -चित्रपट काश्मीर की कली
या सिनेमातल्या इतर हलक्याफुलक्या,उडत्या ठेक्याच्या गाण्यांमध्ये देखील हे गाणे आपली वेगळी छाप पाडून जातं. ओ. पी. नय्यर यांच्या टिपिकल टांगा ह्रिदम पेक्षा संपूर्णपणे वेगळं असं हे गाणं. शम्मीकपूरला रफीचा आवाज का suit व्हायचा याच्या कितीतरी खुणा या गाण्यात दिसतील.
https://youtu.be/WO_aMRsEIIY
https://youtu.be/WO_aMRsEIIY
३) दिन ढाल जाये रात न जाये- चित्रपट गाईड
या एस डी च्या गाण्यातील पहिले काही शब्द त्याच चालीत त्यांचा सुपुत्र आर डी यांना 'किनारा' चित्रपटातील 'अब के ना सावन बरसे' यात वापरावेसे वाटले म्हणजे या मूळ गाण्याचे माहात्म्य लक्षात यावे. यात interlude मधल्या काही तुकड्यांमध्ये वीणा वापरलंय की ती गिटार आहे ?
https://youtu.be/HrbzfLFj6Es
https://youtu.be/HrbzfLFj6Es
(Disclaimer : एक डॉक्टर या नात्याने मला हे सांगावेसे वाटते की ही गाणी पोस्ट करून किंवा त्याबद्दल लिहून मी कुठल्याही प्रकारे दारू पिण्याचे समर्थन किंवा उदात्तीकरण करू इच्छित नाही !)
(जर तुम्हांला या तिन्ही गाण्यांचा सांगीतिक समान धागा लक्षात आला नसेल आणि तो जाणून घेण्याची इच्छा असेल तर- या तिन्ही गाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात सॅक्सोफोनचा वापर करण्यात आला आहे)
(जर तुम्हांला या तिन्ही गाण्यांचा सांगीतिक समान धागा लक्षात आला नसेल आणि तो जाणून घेण्याची इच्छा असेल तर- या तिन्ही गाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात सॅक्सोफोनचा वापर करण्यात आला आहे)