१
हिमाचल प्रदेशवर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे हे तिथे अगदी पाऊल टाकल्या टाकल्याच लक्षात येतं. आपण उष्ण प्रदेशातून तिथे जातो. आम्ही पुण्यातून गेलो तेव्हा पुण्यात ३८-३९ डिग्री तापमान होतं. अमृतसरला सुद्धा उकाडा होता. मात्र हिमाचल प्रदेशला पोचल्यावर लगेच वातावरणातला फरक जाणवला. आणि समोर जेव्हा बर्फाच्छादित शिखरं बघितली तेव्हा तेव्हा नकळत वा ! असा उद्गार आला. ही हिमशिखरं बघूनच अंगाची झालेली लाही लाही कुठल्याकुठे पळून गेली !
या धौलाधार पर्वतरांगा -शिवालिक पर्वतातून निर्माण झालेल्या, कांगडा आणि मंडीच्या उत्तरेला असलेल्या. हिमाचल प्रदेशच्या वायव्य दिशेपासून सुरु होऊन मनालीजवळील पीर पंजाल पर्यंत विस्तार असलेल्या. सर्वसाधारण उंची ३५०० ते ६००० मीटर. याच रंगात मणिमहेश पर्वत देखील आहे-
तर कसोल या पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या सुंदर,टुमदार गावातून दिसलेला हिमालयाचा हा नजारा-
डोळ्यांचं पारणं फिटेल अशी आणि डोळ्यांना सुखावह वाटेल अशी ही निसर्गाची नेपथ्यरचना !
२
आम्ही एप्रिल महिन्यात हिमाचलला गेलो होतो. त्यामुळे बर्फवृष्टीचा काळ संपला होता . तरी काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला बर्फ साठलेला आम्हांला दिसला.
आम्हांला बरीच झाडं आणि फुलं बघायला मिळाली. उंचच उंच पाईन, देवदार वृक्ष तर बघितलेच-
|
हा फोटो खज्जियारचा आहे.
|
याशिवाय इतरही बरीच झाडं दिसली. पण सगळ्यात पहिल्यांदा काय जाणवलं असेल तर आसमंतात दरवळणारा आंब्याच्या मोहोराचा सुगंध! तिथे आत्ता मोहोर आहे म्हणजे प्रत्यक्ष फळ येईपर्यंत महिने-दोन महिने नक्कीच लागतील. धरमशाला मधील वॉर मेमोरियल मधल्या बागेतला हा आंब्याच्या झाडाचा फोटो-
आम्हांला हिमाचल प्रदेशाचं राज्य फूल ऱ्होडोडेंड्रॉन सुद्धा दिसलं. झाडांवर लाल लाल फुलांचे गुच्छ लगडलेले बघायला मिळाले. जणू काही झाडं सुद्धा वसंत ऋतूचं तोरण लावून उत्साहात स्वागतच करत आहेत असं ते दृश्य होतं-
हे फूल मी खाल्लं सुद्धा- छान आंबट-गोडसर चव होती. याच ऱ्होडोडेंड्रॉन पासून होमिओपॅथीमध्ये सांधेदुखीसाठी औषध तयार केलं जातं.
याशिवाय आम्हांला जागोजागी पांढऱ्या फुलांनी बहरलेली झाडं दिसली. लांबूनही ती चित्ताकर्षक दिसत होती. या झाडाला स्थानिक भाषेत कचनार म्हणतात. इंग्रजीत माउंटन एबोनी तर शास्त्रीय नाव- Bauhinia variegata (म्हणजे आपल्याकडे जसं कांचन असतं तसंच. फक्त कांचनची फुलं जांभळ्या रंगाची तर ही पांढरी असतात ) -
या फुलांचं लोणचं करतात. तसंच यातही औषधी गुणधर्म आहेत. Anti oxidant आणि Anti cancer गुणधर्म आहेत. आमचा ड्राइव्हर तर म्हणाला होता की थायरॉईड च्या आजारांसाठी देखील ही फुलं उपयुक्त आहेत.
याशिवाय आणखी काही सुंदर फुलं दिसली. त्यांचे फोटो आणि नावं -
|
Crofton Weed (Ageratina adenophora) |
|
Oxalis debilis |
|
Rumex acetosella |
|
Bradford Pear (Pyrus calleryana) |
|
Indian Nard (Nardostachys jatamansi) |
|
Bergenia ciliata |
|
also called पाषाणभेद
|
|
Ageratum houstonianum
३
हिमाचलला पक्षी निरीक्षणासाठी जायचं असं काही ठरवलं नव्हतं. फक्त २ कॅमेरे नेले होते. सहज पक्षी दिसले तर फोटो काढायचे एवढाच उद्देश आणि पक्ष्यांनी सुद्धा निराश केलं नाही ! बरेच पक्षी दिसले. काहींचे फोटो काढले. काहींचे काढता आले नाहीत. पण त्याचं एवढं दुःख झालं नाही. उलट कोणतीही अपेक्षा नसताना काही सुंदर पक्षी बघायला मिळाले याचाच आनंद जास्त मिळाला. तर तिथे दिसलेल्या काही पक्ष्यांचे हे फोटो -
Plumbeous Redstart White capped Redstart
Brown fronted Woodpecker Streaked Laughing Thrush Himalayan Bulbul Yellow billed Blue Magpie Verditer Flycatcher Gray Wagtail Brown Dipper Brown Dipper juvenile Kalij Pheasant Female Blue Whistling Thrush Himalayan Griffon Vulture
Green backed Tit
४
संकीर्ण:
खरं म्हणजे या गोष्टीला कुठे जागा द्यायची याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. म्हणून तिला संकीर्ण या नावाखाली घातलं आहे. आम्ही धरमशालाहून रात्रीचा प्रवास करून भून्तर या गावी उतरलो. इथून टॅक्सीने कसोलला गेलो. रात्रभर प्रवासाचा तसा शीण होता. पण ड्राइव्हर गप्पीष्ट होता त्यामुळे जरा इकडच्या तिकडच्या गप्पा चालूच होत्या. वाटेत डाव्या बाजूला एक उंच डोंगर दिसला आणि त्यावर वस्तीसुद्धा दिसत होती. पण खरं तर हा डोंगर इतर भागांशी अजिबात संपर्क नसलेला वाटत होता. मी आपलं ड्राइव्हरला सहज विचारलं - इथले लोक जगाशी कसे कनेक्टेड राहतात ? कारण सर्वार्थाने एकदम कट ऑफ असलेला हा भाग दिसतोय. त्यावर त्याने दिलेली माहिती एकदम उद्बोधक होती. तो म्हणाला की हे मलाना नावाचं गाव आहे. इथले लोक स्वतःला भारताचा नागरिक मानतच नाहीत. इथले कायदे कानू वेगळे आहेत. भारतात अफूची शेती करणं बेकायदेशीर आहे पण इथे ती सर्रास केली जाते. इथे कोणी बाहेरचे लोक आले तर त्यांनी कुठल्याही वस्तूला हात लावायची परवानगी नसते.ते कधी शेक हॅंड करत नाहीत आणि म्हणूनच कदाचित कोव्हिड काळात इथे कोणीही कुठलीच लस देखील घेतली नाही. इथल्या लोकांची भाषा सुद्धा वेगळीच आहे आणि ती फक्त त्या गावातील लोकांनाच बोलता येते. मागे आम्ही काश्मीरला गेलो असताना बारामुल्ला जवळ आम्हांला पलहलन गाव लागलं होतं. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या संपूर्ण गावाने एकदाही कुठल्याही मतदानात भाग घेतला नव्हता असं आम्हांला आमच्या ड्राइव्हर ने सांगितलं होतं त्याची या मलानावरून आठवण झाली. एकदा वाटलं की हा ड्राइव्हर कशावरून खरं बोलत असेल? म्हणून विकिपीडिया वर जाऊन बघितलं तर आणखी आश्चर्यकारक माहिती मिळाली. इथले लोक म्हणे अलेक्झांडरच्या सैनिकांचे वंशज आहेत. त्यांना वाटतं की त्यांचं गाव हे जगातलं सर्वात जुनं प्रजासत्ताक आहे. ड्राइव्हर म्हणाला तसे खरोखरच त्यांचे वेगळे कायदेकानू आहेत. मलानाचे फोटो काढता आले नाहीत पण ही माहिती खूपच नवीन आणि वेगळी वाटली. अधिक माहितीसाठी विकिपीडिया ची लिंक -
(क्रमश:)
|
2 comments:
Very nice and useful information..
After reading feel like to visit said place.
Well nice post
And very good photos.
Thanks.
फोटो सुरेख आणि वर्णन खूपच छान ओघवते
Post a Comment