१
The Lake District हा इंग्लंड मधील वायव्य दिशेला असलेला डोंगराळ प्रदेश आहे आणि हे एक राष्ट्रीय उद्यानही आहे. हा भाग Cumbria या कौंटीमध्ये येतो. इथेच इंग्लंडमधील सर्वाधिक उंचीचा डोंगर Scafell Pike ( सुमारे ३,२०० फूट ) आहे. याच्या नावाप्रमाणेच या भागात अनेक तलाव आहेत. (प्रामुख्याने १६).त्यापैकी विंडरमिअर नावाचा इंग्लंडमधील सर्वात मोठा (१८ किमी लांबीचा आणि सुमारे १४चौरस किमीचा) तलाव आहे. तसंच The Lake District ला समुद्रकाठही लाभलेला आहे. अशा वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्याचं वरदान मिळालेल्या भागात आम्ही २ दिवस(च) राहिलो.
विंडरमिअर तलावाजवळच याच नावाचं एक नितांतसुंदर, निवांत छोटंसं गाव!
गाव जरी छोटं असलं तरी ते सर्व सुखसोयी उपलब्ध असलेलं स्वयंपूर्ण गाव आहे. पर्यटकांसाठी महत्त्वाचं गाव कारण ते रेल्वेने जोडलं गेलं आहे. इथूनच पुढे वेगवेगळ्या ठिकाणी जाणं सोयीचं आहे. त्यामुळे पर्यटकांच्या उत्साही गर्दीने हे गाव ओसंडून वाहत असतं. मात्र ते वाहवत जात नाही. इथेही एकेरी वाहतूक/सिग्नलचे नियम पाळले जात होते. त्यामुळे गाड्यांची गर्दी असली, रस्ते छोटे असले तरी ट्रॅफिकजॅम झालं नाही. वाहतूक थोडी संथ गतीने सुरू होती इतकंच !
दोन दिवस आम्ही या उत्कृष्ट रिसॉर्टमध्ये राहिलो-
आतून ते असं दिसत होतं -
वर्डस्वर्थचा जन्म The Lake District मधल्याच Cockermouth या ठिकाणी झाला. त्याच्या आयुष्यातील मोठा आणि त्याच्या सर्जनशीलतेच्या दृष्टीने महत्त्वाचा कालखंड(१७९९ ते १८०८) त्याने ग्रास्मिअर या गावी असलेल्या Dove Cottage या घरी घालवला. इथल्या मातीतच काहीतरी खास असावं की ज्याने त्याच्या प्रतिभेला उधाण आलं असावं. अर्थात त्याने फक्त या प्रदेशाचं वर्णन करणाऱ्याच कविता लिहिल्या नाहीत तर इथल्या सर्वसामान्य माणसांवरही कविता लिहिल्या. त्याचे हे घर अजूनही जतन करून ठेवलं आहे हे मला आमच्या ट्रिपची आखणी करत असताना समजलं होतं. मी त्याचे काही व्हिडिओ देखील बघितले होते. त्यामुळे आम्हांला इथे अगदी जायचंच होतं. माझ्या भाच्याने त्याची तिकिटं आधीच काढून ठेवली होती. आम्हांला जी वेळ दिली होती त्यापेक्षा तिथे पोचायला उशीर झाला होता. सुदैवाने त्यादिवशी तिथे फारशी गर्दी नसल्याने आम्हांला पुढच्या ग्रुपबरोबर हे घर आणि त्यालगत असलेल्या संग्रहालयाला भेट देता आली.
३१८९१ साला पासून वर्डस्वर्थचं हे घर लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. वर्डस्वर्थ ट्रस्टच्या अखत्यारीत हे घर येतं. बाहेरून हे घर असं दिसतं -
एकूण असं तिथे जिवंत वातावरण होतं. मी आमच्या गाईडला म्हणालो देखील- असं वाटतंय की वर्डस्वर्थ इथेच कुठंतरी असेल आणि तो आपण थांबलो तर आपल्याला भेटायला कधीही येऊ शकेल!
२
विल्यम वर्डस्वर्थ (७ एप्रिल १७७० ते २३ एप्रिल १८५०) हा इंग्रजी साहित्यातील एक रोमँटिक निसर्गकवी! इंग्रजीच नव्हे तर जागतिक साहित्याच्या पटलावर आपलं नाव कोरणारा एक प्रमुख साहित्यिक! आम्हांला शालेय जीवनात त्याच्या 'I wandered lonely as a cloud( Daffodils)' आणि 'Solitary Reaper' या दोन सुप्रसिद्ध कविता इंग्रजी पाठयपुस्तकात अभ्यासासाठी होत्या. त्यावेळी अर्थातच त्या अभ्यासाचा भाग असल्याने त्या तेवढ्यापुरत्याच वाचल्या गेल्या. तरीही 'Daffodils' मधला अतिशयोक्ती अलंकार- 'Ten thousand I saw at glance !' किंवा 'jocund', 'They flash upon that inward eye' यासारखे शब्द लक्षात राहिले होते. पुढे कास पठाराला भेट दिली तेव्हा उमललेली हजारो फुलं बघून याच 'Daffodils' कवितेची प्रकर्षाने आठवण झाली होती.
तसंच याच कवितेत त्याने वर्णन केलेल्या -
For oft, when on my couch I lie In vacant or in pensive mood, They flash upon that inward eye Which is the bliss of solitude; And then my heart with pleasure fills, And dances with the daffodils. -या मन:स्थितीचाही बऱ्याच वेळा अनुभव घेतला होता. आणि inward eye चा खरा अर्थ काय हेही लक्षात आलं. वर्डस्वर्थने जे पद्यात मांडलं तेच शब्दबंबाळ वर्णन मी आमच्या २०१४ सालच्या काश्मीर ट्रीपच्या शेवटच्या दिवसाच्या अनुभवावर केलं होतं. त्या ब्लॉगची लिंक इथे देत आहे-https://rajeshpusalkar.blogspot.com/2014/07/kashmir-diary-9.htmlवर्डस्वर्थचा जन्म The Lake District मधल्याच Cockermouth या ठिकाणी झाला. त्याच्या आयुष्यातील मोठा आणि त्याच्या सर्जनशीलतेच्या दृष्टीने महत्त्वाचा कालखंड(१७९९ ते १८०८) त्याने ग्रास्मिअर या गावी असलेल्या Dove Cottage या घरी घालवला. इथल्या मातीतच काहीतरी खास असावं की ज्याने त्याच्या प्रतिभेला उधाण आलं असावं. अर्थात त्याने फक्त या प्रदेशाचं वर्णन करणाऱ्याच कविता लिहिल्या नाहीत तर इथल्या सर्वसामान्य माणसांवरही कविता लिहिल्या. त्याचे हे घर अजूनही जतन करून ठेवलं आहे हे मला आमच्या ट्रिपची आखणी करत असताना समजलं होतं. मी त्याचे काही व्हिडिओ देखील बघितले होते. त्यामुळे आम्हांला इथे अगदी जायचंच होतं. माझ्या भाच्याने त्याची तिकिटं आधीच काढून ठेवली होती. आम्हांला जी वेळ दिली होती त्यापेक्षा तिथे पोचायला उशीर झाला होता. सुदैवाने त्यादिवशी तिथे फारशी गर्दी नसल्याने आम्हांला पुढच्या ग्रुपबरोबर हे घर आणि त्यालगत असलेल्या संग्रहालयाला भेट देता आली.
३१८९१ साला पासून वर्डस्वर्थचं हे घर लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. वर्डस्वर्थ ट्रस्टच्या अखत्यारीत हे घर येतं. बाहेरून हे घर असं दिसतं -
या घराचं वैशिष्ट्य म्हणजे ते त्याकाळी जसं होतं त्याच प्रकारे ते अजूनही ठेवण्यात आलं आहे. घराचे काही फोटो-
हे घड्याळ त्याकाळचं आहे आणि ते बरोबर वेळ दाखवत आहे !
हे स्वयंपाकघर! काही गोष्टी त्याकाळच्या! काही त्या काळाचा अंदाज यावा म्हणून ठेवलेल्या!
हे स्वयंपाकघर! काही गोष्टी त्याकाळच्या! काही त्या काळाचा अंदाज यावा म्हणून ठेवलेल्या!
हा बिछाना असा दिसतोय की जणू एखादा माणूस आत्ताच झोपेतून उठून बाहेरच्या खोलीत गेला आहे.
त्याकाळचं वर्तमानपत्र!
लिखाणासाठी त्यावेळी पक्ष्याचे पीस वापरत. असं वाटतंय की लिखाण केल्यावर थोडा बदल म्हणून कवी बाहेर गेला आहे.
एकूण असं तिथे जिवंत वातावरण होतं. मी आमच्या गाईडला म्हणालो देखील- असं वाटतंय की वर्डस्वर्थ इथेच कुठंतरी असेल आणि तो आपण थांबलो तर आपल्याला भेटायला कधीही येऊ शकेल!
हा घराच्या मागच्या बाजूला उभं राहून काढलेला फोटो आहे.
संग्रहालय देखील बघण्यासारखं आहे. वर्डस्वर्थच्या आत्मचरित्रात्मक 'The Prelude' या दीर्घ कवितेची इथे मूळ प्रत आहे. त्याने त्याची बहीण डोरोथीला लिहिलेलं मोठं पत्र देखील आहे. त्याच्या आयुष्याचे महत्त्वाचे टप्पे आणि त्याकाळातील जागतिक घडामोडी असाही तिथे पट मांडण्यात आला आहे. कवी आणि त्याच्या कालखंडाचा कॅनव्हास एकत्रित दर्शवण्यात आल्यामुळे कवीच्या प्रतिभेची उंची अधिकच लक्षात आली.
४
वर्डस्वर्थचं घर बघायला जाणार तेव्हाच ठरवलं होतं की इथे त्याच्या त्या दोन कविता आपण वाचायच्या. या कविता वाचनाची कल्पना मला लेखक आणि पत्रकार श्री. श्रीपाद ब्रह्मे यांच्याकडून मिळाली. त्यांनी शेक्सपिअरच्या गावी विंदा करंदीकरांची कविता वाचली होती( मी तिथे गेल्यावर तीच कविता वाचली, जे पुढच्या ब्लॉगमध्ये कधीतरी येईलच!) त्यामुळे या सुंदर कल्पनेसाठी श्री. ब्रह्मे यांचे आभार!
वर्डस्वर्थच्या घरामागे बसून आपल्याला त्याच्याच कविता वाचायला मिळतील हे माझ्यासाठी अगदी स्वप्नवत होतं. अतिशय भारलेल्या वातावरणात मी हे वाचन केलं. त्यामुळे ते सादरीकरण म्हणून खूप काही चांगलं झालं नसेलही. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने एका उत्तुंग प्रतिभेच्या कवीला दिलेली ती एक मानवंदना आहे असंच याकडे बघावं! या दोन कवितांच्या वाचनाचे व्हिडिओ इथे देत आहे-
Daffodils -
Solitary Reaper
(क्रमश:)














No comments:
Post a Comment