Saturday 13 April 2013

अंतस्थ हेतू




 Tuesday, 25 October 2011


( Just before Diwali) 

नमस्कार मित्र हो !
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या निखळ आणि निरपेक्ष शुभेच्छा !
हल्ली स्वत:च्या निरपेक्षपणाबद्दल जे स्वत:च बोलतात, त्यांच्या बाबतीत शंका घेतली जाते.
त्यामुळे तुम्हालाही वाटेल की या शुभेच्छांमागे  
माझा काही अंतस्थ हेतू तर नाही ना?

घाबरू नका..
कुठलेसे funkangan विकणारा मी कोणी नामांकित सराफ नाही..
(अंगा-पिंडाने दिसत असलो ) तरी तुम्हांला flats च्या schemes देणारा  मी बिल्डर नाही..
माझं LCD/LED/Plasma TV चं दुकानही नाही.
माझ्याकडे mobiles च्या Galaxysची कुठली रेंज ही नाही.
त्यामुळे मी तुम्हाला काहीही विकणार नाही ...
मग पटतंय ना -माझा अंतस्थ हेतू नाही ते ?

प्रत्येक सण हा आता एक इव्हेंट असतो 
आणि त्यात सहभागी होणारे आपण Consumer असतो. 
'ग्राहक-राजा' ला आकर्षित करण्यासाठी 
बाजारपेठा नुसत्या सजल्याच नाहीत तर अक्षरश: उधळल्या आहेत.

खोटं कशाला बोलू ? 
मी ही भुललो... मी ही खरेदी केलीच! 
पण... मला या बाजारात माझ्यासकट दिसतात...
(वयाने मोठी झालेली) लहान मुले! 

Ice-cream  किंवा खेळण्याच्या दुकानात गेल्यावर 
भिरभिरत्या नजरेने पाहणारी..
काय घेऊ आणि काय नको अशी अवस्था होणारी !
ते अतृप्त मूलच tempt होतं या बाजारातील रंगीबेरंगी भुल्भुलैय्याना! 

माझ्या अंतस्थ हेतूबद्दल तुम्हाला आता वेगळीच शंका तर येऊ लागली नाही ना? 
नाही.. मी कुठलेही प्रवचन किंवा प्रबोधन करणार नाही.

पण मला सांगा-
आपण वर्षभर खरेदी करतो..
फराळाचे पदार्थ वर्षभर केव्हाही खातो...
फटाके कधीही उडवतो...
दिवाळी पहाट सारखे सांस्कृतिक कार्यक्रम कुठे ना कुठे बघतोच. 

मग हा दिवाळीचाच अट्टहास का?
हे सगळं स्पर्धेनं करणं का?
सणांसाठी आपण की आपल्यासाठी सण? 

तुम्ही म्हणाल याचा अगदी 'समाजवादी वैचारिक गोंधळ' उडाला आहे.

आहे खरा! 
पण तरीही मला वाटतं- या दिवाळीत आपण काहीतरी वेगळं करूयात.
नातेवाईक-मित्र परिवाराला भेटूया..
नात्यांची वीण घट्ट करूयात.
संवाद वाढवूयात ..

'अंधाराकडून प्रकाशाकडे' या दिवाळीच्या व्यापक अर्थाचा विचार करूयात.
आपले पूर्वग्रह, अभिनिवेश तपासून पाहूयात.

माझा असलाच तर अंतस्थ हेतू, तुम्हाला हे सांगण्याचा आहे की 
आपण आपल्या परीने, दुसऱ्याच्या आयुष्यात 
मिणमिणती का असेना पण पणती बनून 
प्रकाश देण्याचा प्रयत्न करूयात.

No comments: