Thursday 1 June 2023

सायकलिंग करता करता पक्षीनिरीक्षण ... (भाग २)

१  


पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सायकलिंग करून पक्ष्यांचे फोटो काढले तरी मला समाधान वाटेना. असं वाटायचं की अशी एखादी जागा असावी जिथे आपल्याला निवांतपणे फोटो काढता येतील..जिथे गर्दी नसेल..आणि दररोज काहीतरी नवीन बघायला मिळेल. आणि सुदैवाने अशी जागा माझ्या शाळकरी मित्र श्रीधर अय्यर याने सुचवली. ती म्हणजे विठ्ठलवाडी , सिंहगड रोड पुणे येथील नदीकाठ ! इथे नदी नाल्याच्या स्वरूपात का असेना, पण वाहत असते! शिवाय नदीच्या पलीकडे  उंच उंच झाडं दोन्ही बाजूंना दगडी कठडे, त्यांच्या मागे गवत वाढलेलं... काही ठिकाणी नाजूक रानफुलं तर काही ठिकाणी कर्दळीची झाडं... घाटावर एक शंकराचं देऊळ...नदीपर्यंत जाण्यासाठी खडया  पायऱ्या उतरून जायचं ..आणि देवळाला लागून असलेल्या दगडी कठड्यावर सावलीत शांतपणे बसायचं आणि निवांत फोटो काढायचे ! ही जागा मला एकदम आवडली ! म्हणजे मी  प्रेमातच पडलो तिच्या ! नंतर माझ्या  लक्षात आलं की तिथेच स्मशानभूमी आहे - इथे अंत्यसंस्कार होतात. देवळाच्या बाहेर दहाव्याचे विधी होतात. नदीकिनारी कितीतरी वेळा लोक अन्न ठेवून कावळ्यांची वाट पाहताना बघितले आहेत. तर कितीतरी लोक इथे अस्थिविसर्जनही करतात. पण मग अशा ठिकाणी पक्षीनिरीक्षण करायला जावं का? असा प्रश्न सुदैवाने मला एकदाही पडला नाही. स्मशानभूमी, दहाव्याचे विधी , अस्थी वगैरे या  गोष्टींची ना मला कधी  भीती  वाटली ना याचा अडथळा जाणवला. नदीकाठ मोठा असल्यामुळे अशा प्रसंगी मी या विधींपासून  फोटो काढतो आणि त्यांच्या कार्यात माझ्यामुळे लक्ष विचलित होऊ नये किंवा त्यांच्या या गंभीर प्रसंगांत आपल्यामुळे व्यत्यय येऊ नये एवढी मी काळजी घेतो. पण खरं सांगतो ही जागा एवढी सुरेख आहे आणि इथे मी  जरी थांबलो तरीही दररोज काही ना काही घडताना दिसतं. त्यामुळे आता सगळ्या जागा बाजूला सारून मी दररोज इथेच जात आहे. चुकला पीर मशिदीत तसा मी कायम विठ्ठलवाडीला  नदीकाठी! 

२ 

५ डिसेंबर पासून सायकलिंग करता करता केलेल्या पक्षीनिरीक्षणात आजवर खालील पक्षी दिसले आहेत -(यात सायकलिंग वगळता बघितलेल्या पक्ष्यांचा समावेश केलेला नाही )

1) Little Grebe

2) Ruddy Shelduck

3) Domesticated Mallard

4) Spot-billed Duck

5) Coot

6) Woolly necked Stork

7) Open billed Stork

8) Painted Stork

9) Little Egret

10) Cattle Egret

11) Intermediate Egret

12) Pond Heron 

13) Gray Heron

14) Purple Heron

15) Yellow Wagtail

16) Gray Wagtail

17) White Wagtail

18) White browed Wagtail

19) Black winged Stilts

20) Red Wattled Lapwing

21) Spot breasted Fantail

22) White breasted Water hen 

23)  White throated Kingfisher 

24) Common Kingfisher

25) Green Bee Eater

26) Common Sandpiper\

27) Wood sandpiper

28) Green Sandpiper

29) Pied Bushchat

30) Magpie Robin

31) Great Tit

32) Ashy Prinia

33) Red Whiskered Bulbul

34) Red vented Bulbul

35) Gray Hornbill

36) Rose ringed Parakeet

37) Alexandrine Parakeet

38) Drongo

39) Little Cormorant

40) Greater Coucal

41) Glossy Ibis

42) Red naped Ibis

43) White headed Ibis

44) Laughing Dove

45) Yellow footed Green Pigeon (state bird of Maharashtra)

46) Blyth's Reed Warbler

47) Purple Sunbird

48) Tailor Bird

49) Brahminy Starling

50) Golden Oriole

51) Coppersmith Barbet

52) Long tailed Shrike

53) Shikra (याचा फोटो काढता आला नाही) 

54) Pied Kingfisher (फोटो नाही) 

55) Tickel's Blue Flycatcher (फोटो नाही) 

56) Wire tailed Swallow

57) Asian Koel

58) Common Hawk Cuckoo

59) Siberian Stonechat

60) Spotted Owlets 

61) Black Kite 

याशिवाय मुंगूस, खेकडा, कासव यासारखे प्राणीही दिसले. 

३  

खरं तर ज्यांचे फोटो काढता आले त्या सगळ्यांचेच फोटो काढताना मजा आली...मग ते पक्षी मोठे असोत -

                                                  

Open billed Storks


Red naped Ibises 
 
Black headed Ibises 


Painted Stork  
 

Painted Stork 
 

Painted Stork (L) Purple Heron (R) 
 

Gray Heron 
 
Gray Hornbill


Cattle Egret
 
.....की छोटे असोत ! किंबहुना छोटया  पक्ष्यांचे फोटो काढणं माझ्यासाठी तरी आव्हानात्मक होतं -कारण हे पक्षी अतिशय चंचल असतात. ते एका जागी फारच थोडा वेळ बसतात. ती वेळ साधून फोटो काढणं हे ते आव्हान ! पण या छोट्या पक्ष्यांच्या फोटोमुळे फोटोग्राफीतल्या  एका वैशिष्ट्याची सवय झाली ती म्हणजे- Bokeh effect ( background effect)  तर आता अशाच  काही सुंदर आणि नाजूक पक्ष्यांचे हे फोटो - यातही मला Pied Bushchat या  काढताना फारच मजा अली कारण तो एक अतिशय गोड़  पक्षी आहे-
Pied Bushchat
 


Common Kingfisher 
 
Long tailed Shrike

White Wagtail


Yellow eyed Babbler 


Blyth's Reed Warbler 


Coppersmith Barbet 

Ashy Prinia 
 
हे पक्षीनिरीक्षण करत असताना दिसलेली/भेटलेली माणसं आणि त्यामुळे माझ्यापुढे खुला झालेला खजिना याविषयी पुढील ब्लॉग मध्ये ! 
                                                                                                                    (क्रमश:)

No comments: